आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा शाळांच्या विद्यार्थ्यांची संख्या घटली, पहिल्या वर्गात झाली माेठी घट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेच्या काही शाळांमध्ये २०१५-२०१६ या शैक्षणिक वर्षात आठवा, तर एका शाळेत नववा आणि दहावा वर्ग तसेच विविध शाळांमध्ये केजी-१ सुरू होऊनही २०१६-२०१७ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी संख्येत पावणे तीनशे विद्यार्थ्यांनी घट झाली आहे. पहिल्या वर्गातही या वर्षी मागील वर्षाची संख्या पूर्ण होऊ शकली नाही. केवळ महापालिका मराठी मुलांची शाळा क्रमांक २६ मात्र याला अपवाद ठरली आहे. परिणामी प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांना विद्यार्थी संख्या वाढण्यासाठी गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. विशेष म्हणजे मागील वर्षी अनेक वर्षानंतर विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली होती.
महापालिका अस्तित्वात आल्यानंतर गुणवत्ता वाढवण्यासाठी सुर्योदय प्रकल्प सुरू करण्यात आला होता. परंतु तीन वर्षांनंतर हा प्रकल्प बंद झाला. प्रशासनाने गुणवत्तेकडेही लक्ष दिले नाही. परिणामी विद्यार्थ्याची संख्या दरवर्षी घटत गेली. यास केवळ २०११-२०१२ आणि २०१५-२०१६ हे शैक्षणिक वर्ष अपवाद ठरले. या वर्षात विद्यार्ती संख्येत वाढ झाली. परंतु चालू शैक्षणिक वर्षात पुन्हा विद्यार्थी संख्येत घट झाली. मागील वर्षी अनेक शाळांमध्ये प्रथमच आठवा वर्ग सुरू करण्यात आला आहे. तर महापालिका मराठी मुलांची शाळा क्रमांक २६ मध्ये नववा आणि दहावा वर्ग सुुरू आहे. यामुळे जे विद्यार्थी सातवी उत्तीर्ण झाल्यानंतर शाळासोडून जात होते, ते महापालिका शाळांमध्येच राहिले. मागील वर्षी महापालिकेच्या एकूण ३४ शाळांमध्ये सात हजार ४६० विद्यार्थी शिक्षण घेत होते. या शैक्षणिक वर्षातही संख्या सात हजार १९७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

केजी-१चा परिणाम झाला नाही : महापालिकाशाळांपासून दूर गेलेले विद्यार्थी परत मिळवण्यासाठी प्रशासनाने मागील वर्षी महापालिका शाळांमध्ये केजी-१ सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार काही शाळांमध्ये केजी-१ वर्ग तसेच सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या वर्गाचा महापालिकेला पुढील शैक्षणिक वर्षात परिणाम दिसून येईल अशी अपेक्षा प्रशासनाला होती. मात्र प्रत्यक्षात केजी-१ चा परिणाम झाला नाही.

विद्यार्थी संख्या
मराठी २३६०
हिंदी ८३१
उर्दू ४०८९
शाळांची संख्या
मराठी १४
हिंदी
उर्दू १४

महापालिकेच्या शाळेत मराठी, हिंदी, उर्दू माध्यमातून शिक्षण दिले जाते. या वर्षी विद्यार्थी संख्या घटली आहे. मराठी आणि उर्दू माध्यमात ही संख्या घटली असली तरी उर्दू माध्यमात मात्र संख्या नऊने वाढली आहे.

उर्दू माध्यमात किंचित वाढ पालकांचे सहकार्य अपेक्षित
^गुणवत्तावाढीबाबत नियोजनाचाअभाव दिसून येतो. शैक्षणिक संस्था मनपा शाळांच्या मदतीला धावून आल्या आहेत. पालकांनी शाळा शिक्षकांना सहकार्य करणे गरजेचे आहे. सीमा बक्षी, सामाजिक कार्यकर्त्या

समाजाने पुढाकार घेण्याची गरज
^महापालिका शाळांमधील विद्यार्थी हुशार आहेत. त्यामुळे मनपा शाळांचा दर्जा निश्चितपणे सुधारू शकतो. परंतु त्यासाठी केवळ महापालिकेच्या भरवश्यावर राहता, समाजाने अर्थात शैक्षणिक संस्था आणि संघटनांनी पुढे येण्याची गरज आहे. डॉ.गजानन नारे, शिक्षण तज्ज्ञ

साेयी सुविधा देण्यावर भर
^महापालिका शाळांमधीलविद्यार्थ्यांना अधिकाधिक सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले जातील. उज्वला देशमुख, महापौर, महापालिका.

गुणवत्ता वाढवावी लागणार
या शैक्षणिक वर्षात प्रथमच विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. या वाढत्या संख्येत दरवर्षी वाढ होण्यासाठी प्रशासनाला शाळा इमारती दुरुस्त करणे, विद्यार्थ्यांना संगणकासह विविध सोयी सुविधा उपलब्ध करावा लागणार आहेत. तसेच शैक्षणिक गुणवत्ता केवळ वाढवून चालणार नाही तर ती टिकून ठेवावी लागणार आहे.

१६ शाळांमध्ये आठवा वर्ग
महापालिकेच्या एकूण ३४ शाळांपैकी १६ शाळांमध्ये आठव्या वर्गापर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. यात मराठी माध्यमाच्या चार, हिंदी माध्यमाच्या चार आणि उर्दू माध्यमाच्या नऊ शाळांचा समावेश आहे. तर महापालिका मराठी मुलांची शाळा क्रमांक २६ मध्ये दहावीपर्यंत शिक्षणाची सोय उपलब्ध आहे.
बातम्या आणखी आहेत...