आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरपालिकेच्या करवाढीने बुलडाणेकरांची डोकेदुखी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - बुलडाणा नगरपालिकेचे राजकीय स्वास्थ्य बिघडले असतानाच शहरवासीयंाचे स्वास्थ्य बिघडवण्याचा उपक्रम नगरपालिकेने सुरू केला आहे. महिनाभरात शहरातील अतिक्रमण हटवून शहराच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडत धनिकांचे भले केले आहे. त्यातच करवाढ ही सहामाही आकारणी केल्याने तक्रारी वाढत आहे. पाणी वर्षभर वेळेवर मिळत नसताना करवाढ मात्र, दुपटीने करण्यात आली आहे. बुलडाणा शहर हे १४ चौरस किलोमीटर क्षेत्रात विस्तारलेले असून, मालमत्ताधारकांची संख्या १७ हजारांपेक्षा अधिक आहे. शहरासह लगतच्या भागातील नळधारकांची संख्या नऊ हजार ५९० पेक्षा अधिक आहे. नगरपालिकेला या आर्थिक वर्षात कोटी रुपयांचे करापासून उत्पन्न हवे आहे. त्यामुळे नगरपालिकेने १६ फेब्रुवारी २०१५ रोजी अंदाजपत्रक मंजुरीचा ठराव घेेऊन दुपटीने करवाढ केली आहे. दोन टप्प्यात ही कर आकारणी सध्या सुरू आहे. एका नळधारकास ८८६ रुपये कर लागत होता. आता दोन टप्प्यांत १,७७२ रुपये भरावे लागत आहे. पालिकेने संगणकावर मालमत्ताधारकांची नोंद केली. संगणक चुकीचे देयके देत अाहे. परिणामी, मालमत्ताधारक पालिकेत जाऊन तक्रार सांगत असताना त्यांना मात्र, मुख्याधिकारी यांना भेटण्याचे सांगून हुलकावून दिल्या जात आहे. परिणामी, मालमत्ताधारक आता पालिकेच्या दुपटीच्या करवाढीला कंटाळले आहेत.
पालिकासदस्य अडचणीत : नगरपालिकेनेदुपटीने वाढवलेला कर आपल्या प्रभागातील किती नागरिक नियमित भरू शकेल, याचा कोणताही विचार करता नगरपालिका सदस्यांनी करवाढीच्या अंदाजपत्रकावर सह्या ठोकल्या आहेत. नेमकी या वर्षी निवडणूक होणार असतानाच ही करवाढ पालिका सदस्यांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. सदस्यांनी याकडे लक्ष दिल्यास वाट निवडणुकीत वाट लागण्याची शक्यता आता नागरिक बोलू लागले आहेत. याचा फायदा निवडणूक प्रचारातही होणार आहे.

करवाढी विराेधात तीन याचिका दाखल : जिल्हाधिकारीकिरण कुरुंदकर असताना करवाढीविरोधात याचिका दाखल करण्यात आल्या. वास्तविक करवाढीला स्थगिती मिळेल, अशी अपेक्षा असताना जिल्हाधिकारी कुरुंदकर यांनी तारखा लांबवल्या. त्यामुळे नवीन जिल्हाधिकारी यांनी जसे अतिक्रमणाला थारा दिला नाही, तसा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या कराच्या आकारणीतही शिथिलता आणावी, अशी अपेक्षा अतिक्रमणधारकांची आहे.

करवाढीच्या निर्णयावर ११ जानेवारीनंतर सुनावणी
^करवाढी विरोधातील याचिकेतबाजू मांडण्याचे काम अापण पाहत आहोत. या महिन्यात याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी हे ११ जानेवारीपर्यंत रजेवर आहेत. त्यानंतर ही सुनावणी होईल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, करवाढीविरोधात आणखी दाेन याचिका दाखल झाल्या असल्याची माहिती आहे. अॅड. राज शेख, याचिका कर्तेचे वकील.

तारीख पे तारीख
^करवाढही अवाजवी असल्याने २४ जून २०१५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली हाेती. त्यामध्ये पाच महिन्यांत तीन तारखा मिळाल्या. फक्त एकवेळ जिल्हाधिकारी हजर होते. त्यानंतर नवीनच जिल्हाधिकारी रुजू झाले. नोव्हेंबर महिन्यात १२ तारीख मिळाली होती. करवाढ हाेऊन त्याचा भरणा करण्यासाठी नागरिकांना त्रास दिल्या जात आहे. मात्र, निर्णयासाठी फक्त तारीखच मिळत आहे. मो.दानिश याचिकाकर्ते, बुलडाणा.

आंदोलनाची भूमिका घेणार
^करवाढीबाबत पालिकेतमागील भरलेली देयके या वेळी आलेली करवाढीची रक्कम दाखवली. परंतु, मुख्याधिकारी यांना भेटण्याचे सांगत कर विभाग हाकलून लावत होता. आलेला कर म्हणजेच किमान आठ पंधरा दिवस उपाशी राहून पालिकेची चूल पेटवण्यासारखे आहे. याविरोधात आंदाेलन छेडण्याचा मानस आहे. नगरसेवकालाही याबाबत सांगणार आहोत. मनोज गजानन नंद्रेकर, प्रभागक्रमांक ९, बुलडाणा