आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाने केला साडेचार कोटींचा कर वसूल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेच्या मालमत्ता कर वसुली विभागाने चालू आर्थिक वर्षात ३० ऑगस्टपर्यंत एकूण चार कोटी ६२ लाख ३१ हजार २६८ रुपयांच्या कराची वसुली केली आहे. यात चार कोटी २२ लाख २२ हजार ८८९ रुपये थकित कराचे आहेत. परिणामी चालू आर्थिक वर्षाच्या पाच महिन्यांत केवळ ४० लाख रुपयांचा कर वसुल झाला आहे.
जकात आणि स्थानिक संस्था कर बंद झाल्यापासून मालमत्ता कर हे महापालिकेचे उत्पन्नाचे एकमेव स्त्रोत राहिले आहे. त्यामुळेच एलबीटीचे अनुदान महापालिकेला मिळाले तरी या रकमेतून एक महिन्याचे वेतन देता येत नाही. यासाठीच मालमत्ता कर अधिक प्रमाणात वसूल होणे गरजेचे आहे. परंतु मालमत्ता कराच्या वसुलीला दिवाळी नंतर अर्थात डिसेंबरपासून गती येते. परंतु तोपर्यंत धिम्या गतीने कराची वसुली केली जाते. तसेच थकित कराच्या वसुलीसाठी प्रयत्न केले जातात. चालू आर्थिक वर्षात एप्रिल महिन्यात एक कोटी १५ लाख, ९६ हजार थकित तर तीन लाख ५४ हजार चालू, मे महिन्यात थकित वसुली ९९ लाख ५२ हजार तर तीन लाख ६७ हजार चालू, जून महिन्यात ७४ लाख दोन हजार थकित तर सहा लाख ९९ हजार चालू, जुलै महिन्यात ६८ लाख ७४ हजार थकित तर १४ लाख ५१ हजार चालू तर ऑगस्ट उर्वरित.पान
महिन्यात६३ लाख ९६ हजार थकित, तर चालू आर्थिक वर्षातील ११ लाख ३३ हजार रुपयांची वसुली झाली.

एप्रिलचा महिमा : चालूआर्थिक वर्षात एप्रिल महिन्यात सर्वाधिक मालमत्ता कर वसूल झाला, असे दिसत असले तरी प्रत्यक्षात यापैकी ६० टक्के कर हा मागील आर्थिक वर्षातील आहे. अनेक मालमत्ताधारक मार्चअखेरीस कराचा भरणा करतात. काही नागरिक ३० किंवा ३१ मार्चचा धनादेश देतात. एकाच दिवशी हे धनादेश वटल्या जात नाहीत. त्यामुळेच लाखो रुपयांचे धनादेश हे एप्रिल महिन्यात वटले जातात. त्यामुळेच चालू आर्थिक वर्षात ऑगस्टपर्यंत सर्वाधिक वसुली ही एप्रिल महिन्यात दिसते.
बातम्या आणखी आहेत...