आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालिका, महापालिका मतदार नोंदणी १४ पर्यंत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्ह्यातील नगरपालिका महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठीची मतदार नोंदणी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, १४ ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे नोंदणीसाठी आता अवघा आठवडाच उरला आहे.
निवडणूक आयुक्त जे. एच. सहारिया यांनी अलीकडेच जिल्हा प्रशासनाला तसे निर्देश दिले असून, मतदार नोंदणीचे काम प्राथमिकतेने पुढे न्यावे, असे म्हटले आहे. एक जानेवारी २०१७ या अर्हता दिनांकावर ही मतदार यादी तयार केली जात आहे. नवी नावे नोंदवण्याबरोबरच मतदार यादीतील मतदारांच्या नावात दुरुस्ती असल्यास त्याही या निमित्ताने करता येतील. मुळात ही नोंदणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघासाठी केली जात आहे. परंतु, हीच यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी वापरली जाणार आहे. त्यामुळे एक जानेवारी २०१७ रोजी किंवा तत्पूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुण-तरुणींनी मतदार म्हणून नावे नोंदवून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

नावांत दुरुस्ती करण्याचीही संधी
नवी नावे नोंदवण्याबरोबरच मतदार यादीतील मतदारांच्या नावात दुरुस्ती असल्यास त्याही या निमित्ताने करता येतील. त्याचबरोबर स्थलांतरीत, दुबार अथवा मयत व्यक्तींची नावे वगळण्याचीही संधी आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही निवडणूक यंत्रणेने केले आहे.
बातम्या आणखी आहेत...