आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेने पाडले अनधिकृत बांधकाम, मनपाच्या अतिक्रमण विभागाने केली कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - प्रशासनाला प्राप्त झालेल्या तक्रारीवरून अतिक्रमण विभागाने १३ जुलैला रिंग रोडवरील आसरा कॉलनीतील मंजूर नकाशाव्यतिरिक्त बांधलेले बांधकाम पाडले.
गत काही दिवसांपासून अनधिकृत बांधकाम मोहीम थंडावली होती. महापालिकेचे डीसी रुल मंजूर होईपर्यंत ही कारवाई थांबवण्यात आली आहे. डीसी रुलनंतर जेवढे बांधकाम वाचेल तेवढे वाचवून अतिरिक्त बांधकाम पाडले जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे तूर्तास प्रशासनाकडून अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबवली. परंतु, शहरात सुरू असलेल्या बांधकामाबाबत नागरिक थेट प्रशासनाकडे तक्रार करतात. यात वैयक्तिक रोष काढण्यासाठीही अनेकजण तक्रारी करतात. परिणामी, प्रशासनाला तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यावर कारवाई केली. रिंग रोडवरील आसरा कॉलनीत शेत सर्व्हे नंबर ८/१ मध्ये अमित गिरी यांनी बांधकाम करताना नियमानुसार पूर्व बाजूस समास अंतर सोडले नाही.

या समास अंतरात त्यांनी बांधकाम केले. याबाबतची निनावी तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली. या तक्रारीवरून आयुक्तांनी ही कारवाई केली. आयुक्तांच्या आदेशान्वये उत्तर झोनचे क्षेत्रीय अधिकारी कैलास पुंडे यांनी ही कारवाई केली.
बातम्या आणखी आहेत...