आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून प्रकरणातील चार आरोपींना अखेर पकडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - तलवारीनेहल्ला चढवून युवकाची हत्या करण्यात आली. त्यानंतर पळून गेलेल्या हल्लेखोरांना खदान पोलिसांनी सोमवारी सकाळी खदान परिसरातून ताब्यात घेतले. या चारही आरोपींना अमरावती पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अमरावती येथील नवसारी भागातील महात्मा फुले नगरमध्ये रविवारी रात्री एका २४ वर्षीय युवकाचा खून करण्यात आला होता. त्यातील आरोपी हे फरार होते.

रवी उत्तम फरकाडे रा. महात्मा फुले नगर, नवसारी, अमरावती असे मृतकाचे नाव आहे. रवी रविवारी रात्री घराच्या परिसरातच असताना परिसरातील पाच युवकांनी त्याच्यावर तलवारीने हल्ला चढवला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी रविवारी रात्री नीरज राजू उगले (२०) याला ताब्यात घेतले होते. तर अमर मनोज सरोदे (२१), विक्की निरंजन गोले (२१), अक्षय बाळू जुनघरे (२१), रोशन भाऊराव गायकवाड (१९) हे फरार होते. हल्ला केल्यानंतर हे चौघेही अकोल्याला पळून आले होते. ते अकोल्याला असल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी खदान पोलिसांसोबत संपर्क करून पोलिसांनी या चौघांबद्दल माहिती दिली. या आधारे खदान पोलिस ठाण्याचे ठाणेदार सी.टी. इंगळे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी चौघांनाही सोमवारी सकाळी सिंधी कॅम्प रोडवरील एका मटनाच्या दुकानाच्या पाठीमागे असलेल्या एका ओळखीच्या व्यक्तीकडून ताब्यात घेतले. या चारही आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर खदान पोलिसांनी अमरावती येथील गाडगेनगर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर गाडगेनगर पोलिस दुपारी खदान पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यांनी या चारही जणांना ताब्यात घेतले. रवीच्या खुनाचा आरोप असलेले पाचही युवक रवी हे एकाच परिसरातील रहिवासी आहेत. रवी आणि विकी गोले यांचा दहा दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्याच वादाचा वचपा काढण्यासाठी रविवारी रात्री अमर, विक्की, अक्षय, रोशन आणि नीरजने रवीवर हल्ला चढवल्याचे तक्रारीत नमूद आहे. रवी हा पेंटिंगचे काम करतो. त्यासाठीच मागील काही दिवसांपासून तो चिखलदऱ्याला होता. पोलिसांनी सोमवारी पाचही जणांना अटक करून न्यायालयात हजर केले आहे. याप्रकरणी रवीची वहिनी मंगला फरकाडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या पाचही जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.

आरोपींना अमरावती पोलिसांच्या केले सुपूर्द
अमरावतीमध्य घडलेल्या खून प्रकरणातील आरोपी अकोल्यात आल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांकडून मिळाली. त्यानंतर आम्ही शोध मोहीम राबवली असता अमर मनोज सरोदे , विक्की निरंजन गोले , अक्षय बाळू जुनघरे , रोशन भाऊराव गायकवाड हे चार आरोपी मिळून आले. त्यांना पकडून आम्ही अमरावती पोलिसांच्या हवाली केले आहे.'' सी.टी.इंगळे , ठाणेदार, खदान पोलिस ठाणे
बातम्या आणखी आहेत...