आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जावयावर चाकूने वार; साल्याने केली हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - कौटुंबिक वादातून दारू पिण्याच्या बहाण्याने साल्याने जावयाची चाकूने वार करून हत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी वाजतादरम्यान जुने शहरातील हरिहरपेठ पोलिस चौकीजवळ घडली. याप्रकरणी जुने शहर पोलिस ठाण्यात साळ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
माजिद खान सकावत खान (वय ६३, रा. ख्वाजानगर, सोनटक्के प्लॉट) असे मृतकाचे नाव आहे. त्याची सासुरवाडीही येथेच आहे. माजिद खान यांना दारूचे व्यसन असल्यामुळे त्यांची पत्नी त्यांच्याकडे राहता तिच्या भावाकडे राहत होती. येेथेही माजीद खान येऊन त्यांच्या पत्नीला दारू पिण्यासाठी पैसे मागत असे. त्यावरून शेख माजिद आणि त्यांचा साळा सै. चाँद सै. मेहबूब यांच्यात नेहमी भांडणे होत असत. गुरुवारी सायंकाळी सै. चाँद सै. मेहबूब हा माजिद खान यांच्या घरी आला. "आज मीच दारू पाजतो. दोघेही दारू पिऊ', असे म्हणून माजिद खानला घरून बाहेर नेले. या वेळी माजिद खानचा कायमचाच काटा काढण्याच्या या उद्देशाने सै. चाँद चाकू घेऊन होता. ते दोघेही बोलत-बोलत हरिहरपेठेतील पोलिस चौकीजवळ आले. त्यांच्यात तेथे वाद झाला. या वेळी रस्त्यातच सै. चाँद याने त्याच्या जावयावर चाकूने अचानक हल्ला केला. माजिद खान यांच्या गुप्तांगावर त्याने जोरदार वार केल्याने माजिद खान रस्त्यावर कोसळले. त्यानंतर सै. चाँद घटनास्थळावरून पळून जाण्याच्या बेतात असतानाच या ठिकाणी नाकाबंदीवर असलेल्या वाहतूक पोलिसांचे लक्ष गेले. त्यांनी सै. चाँद याला पळून जाण्यापूर्वीच पकडले. त्यानंतर घटनास्थळावर जुने शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार रियाज शेख त्यांच्या ताफ्यासह पोहोचले. त्यांनी जखमी अवस्थेत असलेल्या माजिद खान यांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. काही वेळातच जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा, अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर, पोलिस उपअधीक्षक प्रदीप चव्हाण, रामदासपेठ पोलिस ठाण्याचे ठाणेदार सुभाष माकोडे, अकोटफैल पोलिस ठाण्याचे ठाणेदार अनिल ठाकरे, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे ठाणेदार शिरीष खंडारे घटनास्थळावर दाखल झाले होते. दरम्यान, भर दिवसा रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

वाहतूक पोलिसांनी पकडले आरोपीला
गुरुवारी दुपारी ते सायंकाळी वाजेपर्यंत हरिहरपेठेतील पोलिस चौकीजवळ वाहतूक शाखेची नाकाबंदी होती. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक पोलिस तैनात होते. माजिद खानवर त्यांच्याच साळ्याने वार केला. त्यांच्या आवाजामुळे वाहतूक पोलिस रवी खंडारे यांचे लक्ष गेले. पोलिसांनी आपल्याला पाहिल्याचे लक्षात आल्याने सै. चाँद हा पळून जाण्याच्या बेतात असतानाच त्याला रवी खंडारे यांनी पकडले. तेथील पोलिस चौकीत त्याला डांबले. त्यानंतर जुने शहर पोलिसांना या घटनेची माहिती दिली.