आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिलवान म्हणवून घेणे बेतले जीवावर; युवकाची केली हत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - गांधी राेडवर गुरुवारी झालेल्या युवकाच्या हत्याकांडाच्या वृत्ताची शाई वाळत नाही ताेच शुक्रवारी रात्री संजय नगर परिसरात युवकाचा खून झाल्याची घटना घडली. सलग दुसऱ्या दिवशी खुनाचे सत्र सुरु असल्याने प्रचंड खळबळ माजली अाहे. शेख मुशीर शेख नासीर (वय २८) हे मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचा नाव अाहे. पहेलवान म्हणण्यावरुन खून झाल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे.
गत काही दिवसांपासून शेख मुशीर शेख नासीर परिसरातील शेख राजू शेख मुस्तफामध्ये वाद सुरु हाेता. शुक्रवारीही या दाेघांमध्ये वाद झाला. यापैकी एकाने मद्यप्राशनही केले हाेते. रात्री पुन्हा हा वाद उफाळून अाला. यावादातून शेख मुशीरवर फावड्याच्या दांड्याने हल्ला करण्यात अाला. या हल्ल्यात ताे गंभीर जखमी झाला. रक्तस्त्राव झाल्याने शेख मुशीरचा मृत्यू झाला. याप्रकरणी रामदास पेठ पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु हाेती.

वरिष्ठपाेलिस अधिकाऱ्यांची धाव : घटनेचीमाहिती मिळताच शहर पाेलिस उपअधीक्षक उमेश माने, एसडीपीअाे प्रिया पाटील, रामदास पेठचे ठाणेदार सुभाष माकाेडे, सिटी काेतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे, वाहतूक शाखेचे प्रमुख प्रकाश सावकार यांनी कर्मचाऱ्यांसह धाव घेऊन पाहणी केली. पाेलिसांनी पंचनामाही केला.

दरतीन महिन्यानंतर घडते हत्याकांडाचे सत्र : अकाेल्यातदर तीन महिन्यांतर हत्याकांडाचे सत्र घडल्याचे घटनांवर नजर टाकल्यास दिसून येते. जून महिन्यात २० २१ तारखेला सलग दाेन दिवस खून झाले हाेते. अाता सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या अाठवड्यात खूनाचे सत्र सुरु झाले अाहे.

१) पाेलीसांना अवैध धंद्यांची माहिती देण्याच्या संशयायावरुन माे. अाकीब माे. अारीफ या युवकाची पाच जणांनी २० जून राेजी हत्या केली हाेती केली. घटनेची दिवशी अकिब हा वाशिम बायपास परिसरातील मांस विक्रीचा दुकानात काम करीत हाेता. याच परिसरात त्याच्यावर हल्ला करण्यात अाला हाेता.

२) एमअायडीसी परिसरातील श्रीहरीदाल मिलमध्ये मशीन अाॅपरेटर म्हणून काम करणाऱ्या संताेष शर्मा यांच्यावर हल्लेखाेरांनी गाेळीबार केल्याची घटना २१ जून राेजी घडली हाेती. डाेक्याला जबर दुखापत झाल्याने माेठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला हाेता. या हत्याकांडाला संबंधाची किनार असल्याची माहिती सूत्रांनी दिली हाेती.

एकाची चाैकशी
शेखमुशीर शेख नासीर हत्याकांडानंतर रामदास पेठ पाेलिसांनी शेख राजू शेख मुस्तफा याची चाैकशी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेख राजू हा स्वतःच पाेेलिस ठाण्यात गेला हाेता. शेख राजू शेख मुस्तफाला शेख मुशीरचा मृत्यू झाला हे रात्रीपर्यंत माहीतच नव्हते. पाेलिस शेख राजूची कसून चाैकशी करीत हाेते. या चाैकशीनंतर पाेलिस तपासाची पुढील तपासाची दिशा निश्चित करणार अाहे.

वाद लाखाचा ?
अार्थिक देवाण-घेवाणातून हत्या झाल्याचे प्रथमदर्शनी पुढे अाले अाहे. मृतक जमीर अलीकडून हल्लेखाेरांना दाेन वर्षापासून पैसे घेणे हाेते. पैसे देण्यासाठी हल्लेखोरांनी त्याच्यावर दबाव आणला होता. गुरुवारी घटनेच्या िदवशीही पैशांवरून वाद झाला हाेता. पैशांचा वाद हा लाखाचा हाेता. जमीर हा ५० हजार रुपये देण्यासही तयार हाेता. मात्र हल्लेखाेर ५० हजार घेण्यास तयार नव्हते, असे सूत्रांचे म्हणणे अाहे. पाेलिस तपासातून नेमकी रक्कम पुढे येईल.

बातम्या आणखी आहेत...