आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवरखेडला युवा शेतकऱ्याचा खून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिवरखेड - मारोडी परिसरातील बोहरा यांच्या शेताजवळ युवा शेतकऱ्याचा खून झाल्याची घटना २६ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. सतीश भीमराव ढबाले (वय ३५) असे मृतक युवा शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी संशयित आरोपी मोहन लांडगे याला अटक करण्यात आली आहे.
सतीश ढबाले त्याच्या एमएच ३०, ३२६ क्रमांकाच्या मोटारसायकलने त्याच्या शेतात रखवाली करण्यासाठी २५ जानेवारीला रात्री वाजता गेला होता. २६ जानेवारी रोजी सकाळी विनोद कानतोडे यास सतीश ढबाले मोटारसायकलसह रस्त्यात मृतावस्थेत पडलेला दिसला. विनोद कानतोडे याने मृतकाचा मोठा भाऊ गजानन भीमराव ढबाले यास सांगितले. गजाननने घटनास्थळावर जाऊन पाहिले असता सतीश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याचे त्याला दिसले. त्याच्या कपाळावर धारदार शस्त्राच्या जखमा दिसून आल्या. गजानन ढबाले याने हिवरखेड पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवून संशयित आरोपी मोहन लांडगे यास अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार सुधाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनात तपास अधिकारी पीएसआय हेमंत चौधरी करत आहेत.

संशयित आरोपीसोबत झाला हाेता वाद : याप्रकरणात संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आलेल्या मोहन लांडगेचा मृतक सतीश ढबालेसोबत किरकोळ कारणावरून काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्यामुळेच माेहन लांडगेला संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी अटक केली.
सतीशरखवालीसाठी गेला होता शेतात : मृतकसतीश ढबालेकडे दोन एकर शेत असून, शेतात संत्रा भेंडीचे पीक घेतले जात हाेते. शेतात विचित्र प्रकार घडत होते. यामध्ये शेताचे नुकसान होत होते. हे नुकसान होऊ नये, यासाठी सतीश रोज रात्री वाजता शेतात नियमितपणे जात होता. १२ वाजेपर्यंत शेताची रखवाली करून घरी परत येत होता. मात्र, २५ जानेवारीला शेतात गेलेला सतीश घरी परतलाच नाही.
झोपडी जाळली, शिंग कापले
काहीदिवसांपूर्वी पाइप तोडले होते. तुरीचे झाड कापले होते, झोपडी जाळली होती. नुकतीच बैलजोडी घेतली असून, एका बैलाचे शिंग कापल्या गेले होते. असा प्रकार आमच्यासोबत सुरू होता, असे मृतकाचे काका रामकृष्ण ढबाले यांनी सांगितले.

आरोपीचा घेणार लवकरच शोध
^हिवरखेड येथील युवा शेतकरी खून प्रकरणातील संशयित आरोपीला अटक करून ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे. लवकरच आरोपी कोण हे समोर येणार आहे.'' हेमंत चौधरी, तपासअधिकारी