आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासात गती, संशयितांची ओळखपरेड; 5 वर्षीय चिमुकलीचे हत्‍याप्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पाच वर्षीय चिमुकलीच्या हत्येतील आरोपीचा सुगावा अद्यापही लागला नसला तरी पोलिसांना हाती मारेकऱ्यांचे धागेदारे लागले असल्याची माहिती आहे. पोलिसांच्या तपासाने गती घेतली असून लवकरच आलियाच्या मारेकऱ्यांना बेड्या ठोकणार असल्याचा विश्वास पोलिसांना आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजता नायगाय येथील डंपिंग ग्राऊंडवर पाच वर्षीय आलियाचा मृतदेह नग्नावस्थेत छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला होता. 
 
नायगाव येथील संजय नगरातील रहिवाशी शेख फिरोज शेख रशिद यांची पाच वर्षीय चिमुकली आलिया परवीन हिचा मृतदेह छिन्नविछिन्न नग्नावस्थेत पोत्यात बांधून डंपिंग ग्राऊंडवर पाण्याच्या डबक्यात सापडला होता. आलियाच्या देहासोबत छेडछाड करून नंतर तिची हत्या करण्यात आली असावी पुरावेच नष्ट करण्याच्या उद्देशाने मारेकऱ्यांनी तिचा मृतदेह एका पोत्यात बांधून डंपिंग ग्राऊंडवर डब्यात फेकून दिला होता. कचरा वेचताना संशयास्पदरित्या पोत्यात काहीतरी असल्याचे दिसून आल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती. शवविच्छेदन अहवालात आलियाच्या डोक्यावर गुप्तांगावर गंभीर जखमा असल्याचे दिसून आले. 
 
मात्र तिच्यावर अत्याचार केल्याचे आढळून आल्याने उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत नमुने पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिस डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस करीत आहेत. मात्र आरोपीपर्यंत पोलिसांना पोहचता आले नाही. मंगळवारी जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी घटनास्थळावर जावून पोलिस अधिकाऱ्यांना तपासाच्या दृष्टीने सूचना केल्या. 
 
अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस, अकोट फैल पोलिस ठाण्याचे ठाणेदार तिरूपती राणे तपास करीत असून संशयीतांची ओळखपरेड सुरुच असून आरोपीला लवकरच गजाआड करण्यात येईल, अशी माहिती राणे यांनी दिली. 
बातम्या आणखी आहेत...