आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारांची गर्दी, इच्छुकांच्या हालचालींना अाली गती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूर्तिजापूर - आरक्षणाच्या सोडतीत मूर्तिजापूर येथील नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवाराच्या वाट्याला गेले असून, विविध राजकीय पक्षांमधील इच्छुकांनी आपली उमेदवारी निश्चित करण्याच्या हालचालींची गती वाढवली आहे. मात्र, या आरक्षणामुळे उमेदवारांची संख्या प्रचंड वाढण्याची शक्यता वाढली आहे.
खुल्या प्रवर्गाच्या वाट्याला एखादे महत्त्वाचे पद आरक्षणाच्या सोडतीत गेले, तर आपसुकच सगळ्यांसाठी ती एक पर्वणी ठरते. ती साधण्याचा प्रयत्न सर्वांकडून होत असल्यामुळे स्पर्धा वाढत आहे. कुठलीही युती किंवा आघाडी या निवडणुकीत होण्याची सुतराम शक्यता नाही.
त्यामुळे भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप बहुजन महासंघ हे प्रमुख पक्ष शिवाय काही इतर पक्षांचे अपक्ष उमेदवारांची गर्दी असे या निवडणुकीचे चित्र राहू शकते.
खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी हे पद आरक्षित झाल्यामुळे स्वत:चे अस्तित्व सिद्ध करणारी निर्णयक्षम सक्षम, सुशिक्षित महिला समोर यावी, आपला या पदावरील दावा सिद्ध करण्यास सज्ज व्हावी, अशी अपेक्षा या निमित्ताने जनसामान्यांमधून व्यक्त होत आहे.

स्वत:लासिद्ध करणाऱ्या महिलांसाठी व्हेटो : अकस्मातमहिलांसाठी हे पद आरक्षित झाल्यामुळे भाजपच्या इच्छुकांमधील नावे अद्याप समोर यायची आहेत. नंतर ती येतीलच. या निवडणुकीसाठी पक्षाचा उमेदवार निश्चित करताना समाजकार्य करणाऱ्या, होतकरू, स्वत:चे अस्तित्व सिद्ध करणाऱ्या, स्वच्छ चरित्र्याच्या उमेदवाराला प्राधान्य राहील. अशी महिला पक्षाबाहेरील असली तरी हरकत नाही. कोणताही दबाव किंवा शिफारशीला बळी पडता स्वत:चे अस्तित्व निर्माण करणाऱ्या अशा सक्षम उमेदवारांसाठी व्हेटो वापरणार असल्याचे आमदार हरीश पिंपळे यांनी निक्षून सांगितले.

यांची नावे आहेत चर्चेत
प्रथमदर्शनी भारतीय जनता पक्षाकडून मोनाली कमलाकर गावंडे, शालीना रामा हजारे, गायत्री संगीत कांबे, सुजाता मुलमुले, शिवसेनेकडून संगीता विनायक गुल्हाने, राष्ट्रवादीच्या पूनम महाजन, सौ. अवलवार, भारिप बहुजन महासंघाकडून संजीवनी मेश्राम, सौ. अवलवार, सौ. गावंडे अशी काही नावे चर्चेत आहेत. ही यादी आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, ती उघड होण्यास काही दिवसांचा कालावधी लागू शकतो.
बातम्या आणखी आहेत...