आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम समाजाने फुंकले रणशिंग; शरीयतमध्ये हस्तक्षेपाला जाहीर विरोध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला- ‘मुस्लिम लाॅ’मध्ये हस्तक्षेप करणाऱ्या केंद्र सरकार इतर यंत्रणांच्या विराेधात अकाेल्यात तहफ्फुजे कानूने शरीयत कमिटीतर्फे रविवारी रणशिंग फुंकण्यात अाले. युनिफाॅर्म िसव्हिल काेडच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने सर्वाेच्च न्यायालयात दाखल केलेले प्रतिज्ञापत्र मागे घेण्याची एकमुखी मागणी भव्य सभेत करण्यात अाली.
‘तीनदा तलाक’ म्हटल्यानंतर हाेणाऱ्या घटस्फाेटाच्या मुद्द्यावर काही िदवसांपासून चर्चा सुरू अाहे. मात्र, ही पद्धत बंद करणे अथवा त्यात बदल करणे याला अनेकांनी िवराेध केला अाहे. युनिफाॅर्म िसव्हिल काेड हा तलाक पद्धत नाहीशी करण्याचा प्रयत्न असून इस्लामी शरीयतमध्ये ढवळाढवळ हाेत असल्याचा अाराेप तहफ्फुजे कानूने शरीयत कमिटीने केला.
अकाेल्यातील क्रिकेट क्लबच्या मैदानावर रविवारी अायाेजित सभेला उपस्थित मुस्लिम जनसमुदाय.

सभेतील ठराव
>सरकारने शरीयतमध्ये हस्तक्षेप करण्याला सर्वानुमते विरोध करणे.
> घटनेच्या कलम ४४ चा पुनर्विचार
> शरीयत-ए-मोहंमदी (स.अ.स.) चे पालन करावे आणि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या हस्ताक्षर मोहिमेला सर्वांनी पूर्ण सहकार्य करावे.
> लॉ कमिशनच्या प्रश्नावलीचा सर्वांनी बहिष्कार करावा. मुस्लिमांच्या सर्व जमातींनी शरीयतमध्ये हस्तक्षेपाच्या सरकारच्या प्रयत्नाचा विरोध करावा.
बातम्या आणखी आहेत...