आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीयतमधील हस्तक्षेपाला केला विराेध; जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - मुस्लिम पर्सनल लाॅमध्ये ढवळाढवळ करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी मुस्लिम महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे अांदाेलन केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात अाले. अांदाेलन जमाअत-ए-इस्लमी हिंद अाणि गर्ल्स इस्लामिक अाॅर्गनायजेशन अाॅफ इंिडयातर्फे करण्यात अाले.

‘तीन वेळा तलाक’ असे म्हटल्यानंतर मुस्लिम धर्मीयांमध्ये हाेणाऱ्या घटस्फाेटाच्या मुद्यावर काही दिवसांपासून चर्चा सुरु अाहे. मात्र ही पद्धत बंद करणे अथवा बदल करणे, याला अनेकांनी विराेध केला अाहे.

इस्लामी शरीयतमध्ये बदल किंवा सुधारणा करण्यासाठी िकंचितही वाव नाही. बदल मान्य नसून, इस्लामने महिलांना दिलेले अधिकारी प्राप्त हाेण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यामुळे शासनाने घटनात्मक अधिकाऱ्यांवर गदा अाणू नये, अशी मागणी जमाअत-ए-इस्लमी हिंदच्या सलमा सरवत साहेब अाणि गर्ल्स इस्लामिक अाॅर्गनायजेशन अाॅफ इंडियाच्या एमन खान यांनी दिलेल्या निवेदनात केली अाहे.

संयम अाणि शिस्त : जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर झालेल्या धरणे अांदाेलनात महिला माेठ्या संख्यने सहभागी झाल्या हाेत्या. काेणताही गाेंधळ हाेऊ नये, यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात अाली हाेती. धरणे अांदाेलनानंतर टप्प्यात महिलांना साेडण्यात अाले. महिलाही स्वयंसेवकांच्या सूचनांचे पालन करीत हाेते. त्यामुळे कमी कालवधीत जिल्हाधिकारी परिसरातून महिला मार्गस्थ झाल्या. पाेलिसांच्या म्हणण्यानुसार हजार ५०० महिला सहभागी झाल्या हाेत्या, तर अायाेजकांनी १० हजार महिला सहभागी झाल्याचा दावा केला अाहे.
बातम्या आणखी आहेत...