आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरालगतची आठ गावे झाली म्‍युट : अनेकांच्‍या घरात घुसले पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सततदोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहिल्याने शहरालगतचा आठ ते दहा गावांचा शहराशी संपर्क तुटला. मुसळधार झालेल्या या पावसाने शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील जलप्रकल्पांच्या साठ्यातही वाढ झाली. परंतु, जोरदार पावसामुळे शहराच्या अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले.
शाळांमध्ये विद्यार्थ्यांची तर शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्याही रोडावली होती, तर जनजीवन विस्कळीत झाले होते. जूनमध्ये पावसाने हजेरी लावल्यानंतर पावसाने दडी मारली होती. जुलै महिन्यातही पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे शेतकऱ्यांसोबत सर्वसामान्य नागरिकही हतबल झाला होता. जिल्ह्यातील अनेक जलप्रकल्पांनी मृतसाठ्याची पातळी गाठल्याने जलसंकटही उभे ठाकले होते. त्यामुळे जिल्ह्याला जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. येणार, येणार म्हणून आस लावून बसलेल्या नागरिकांना पावसाने ऑगस्टला पहाटेपासूनच दिलासा दिला. ऑगस्टला शहरासह संपूर्ण जिल्ह्यात दिवसभर दमदार पाऊस सुरू होता. पाऊस रात्रीही आणि ऑगस्टला दिवसभर सुरू राहिल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले. यामुळेच लोणटेक नाला, बोर्डी नाला, अमानतपूर नाला ओव्हरफ्लो झाला.
याच बरोबर जुने शहरातील रेणुकानगर, चिंतामणीनगर, मनोरथ कॉलनी, मेहरेनगर, लक्ष्मीनगर, आश्रयनगर, कोर्ट कॉलनी, अयोध्यानगर, पार्वतीनगर, शारदानगर, भगतवाडी, गुरुदेवनगर, गुरुदत्त कॉलनी, शांतीनगर, अंबिकानगर, न्यू गोडबोले प्लॉट तसेच कौलखेड भागातील नागे ले-आऊटसह अनेक उपनगरे पाण्याखाली गेली. अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले, तर अनेकांना कंबरेइतक्या पाण्यातून घर गाठावे लागले.

तरीहीप्लास्टिक वापरावर बंदी नाही :
महापालिकाप्रशासनाने नाल्याच्या साफसफाईचे काम थातूरमातूर पद्धतीने केले. त्यामुळेच नाल्यांमधून पावसाचे पाणी वाहून जाता रस्त्यावरून वाहत होते. पाण्याला मार्ग काढण्यासाठी काही भागात वेळेवर नाल्यांची साफसफाई करण्यात आली. प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे नाले चोक झाल्याचे आढळून आले.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
लोणटेकनाल्याचा काही भाग महापालिका क्षेत्रात, तर काही भाग ग्रामीण भागात येतो. त्याच बरोबर हा नाला अकोला पूर्व अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात येतो. पूर्वी एक आमदार भाजप एक आमदार भारिप-बमसंचा होता. २० वर्षांपासून ही समस्या या दोन्ही लोकप्रतिनिधींनी सोडवली नाही. आता दोन्ही आमदार भाजपचे आणि खासदारही भाजपचेच असल्याने या लोकप्रतिनिधींनी या नाल्याच्या रुंदीकरणाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

लोणटेक नाल्याची समस्या
जुनाराष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा ते रेल्वे लाइन क्रॉस करणारा लोणटेक नाला वाहतो. पूर्वी या नाल्याभोवती वस्ती नव्हती. आता नाल्याच्या दोन्ही भागात वस्ती वाढली आहे. या वस्तीतले सर्व सांडपाणी या नाल्यात सोडले जाते. नाल्याचे रुंदीकरण काँक्रिटीकरण केल्याने पावसाळ्यात नाला खचतो. परिणामी, नाल्यातील पाणी परिसरातील वस्त्यांत शिरते. दरवर्षी पावसाळ्यात या समस्येला नागरिक तोंड देतात.

रेन वॉटर हार्वेस्टिंगचाही झाला असता फायदा
भूगर्भातीलजलाशयाची पातळी वाढवण्यासाठी छतावर कोसळणारे पावसाचे पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून जमिनीत जिरवणे शक्य आहे. प्रशासनाने तसेच शासनाने नागरिकांना रेन वॉटर हॉर्वेस्टिंग सक्तीचे केले आहे. घराचा नकाशा मंजूर करताना रेन वॉटर हॉर्वेस्टिंगचा उल्लेख करावाच लागतो. मात्र, प्रत्यक्षात पाच टक्के नागरिकांनी रेन वॉटर हॉर्वेस्टिंग केलेले नाही. त्यामुळे छतावर पडलेले पावसाचे पाणी रस्ते आणि नाल्यांमधून वाहून गेले. रेन वॉटर हॉर्वेस्टिंग अधिकाधिक नागरिकांनी केले असते, तर किमान पावसाचे पाणी जमिनीत जिरले असते.

शाळा, कार्यालये पडली ओस
सकाळपासूनसुरू असलेल्या पावसामुळे शाळांमधील विद्यार्थ्यांची, तर शासकीय कार्यालयांत कर्मचाऱ्यांची संख्या रोडावली होती. काही पुलांवरून पाणी वाहिल्याने ग्रामीण भागात कार्यरत शिक्षकांना शाळा गाठता आली नाही, तर बाजारपेठेतही ग्राहकांची वर्दळ कमी होती.
शहरालगतची आठ गावे झाली म्यूट; अनेकांच्या घरात घुसले पाणी

गायगाव मार्गावरील भौरद नाल्यावरील पुलावरून पूर असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला छाया: नीरज भांगे

आठ ते दहा गावांचा शहराशी संपर्क तुटला
अकोलाते गायगाव मार्गावरील बोर्डी नाला (भौरद नाला) आणि अमानतपूर ताकोडा नाल्यावरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने डाबकी, भौरद, अमानतपूर ताकोडा, कंचनपूर, बदलापूर, खडकी, भोळ, भाक्रापूर आदी गावांचा महानगराशी संपर्क तुटला. या भागातील नागरिकांना गायगाव, निमकर्दा, पारसमार्गे तसेच हाथरुण, निमकर्दा, पारसमार्गे अकोला गाठावे लागले, तर निमकर्दा ते पारस या मार्गावरही नाले दुथडी भरून वाहू लागल्याने हा मार्गही काही वेळ बंद होता.
बातम्या आणखी आहेत...