आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘उडान 2017 ’ मेरा राष्ट्र मेरा योगदान यावर ‘आरडीजी’त स्नेहसंमेलनाचे उद्घाटन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला : ‘महाविद्यालयात होणाऱ्या विविध उपक्रमात सहभाग घेतल्याने विद्यार्थ्यांचा विकास निश्चितच होतो. प्रत्येक उपक्रमातून काही ना काही शिकायला मिळते. शिवाय महाविद्यालयात होणारे स्नेहसंमेलन यातून देखील अनेक गोष्टी शिकायला मिळत असतात. जीवनात मनोरंजन अन् शिक्षणाची योग्य सांगड घालता आली पाहिजे,’ असे प्रतिपादन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी केले. 
 
श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयात जानेवारी रोजी ‘उडान २०१७’ या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी शिक्षणासोबत मनोरंजनाचे महत्त्व विषद केले. भारतीय सेवा सदन द्वारा संचालित श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयात रविवार पासून तीन दिवसीय उडान २०१७ या स्नेहसंमेलनाला सुरूवात झाली असून, मेरा राष्ट्र मेरा योगदान या विषयावर यंदाचे स्नेहसंमेलन आधारित आहे. 

स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन समारंभात कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी मनोरंजनाच्या माध्यमातून शिक्षण देण्याचे विषद केले. व्यक्तीच्या जीवनात मनोरंजन आणि शिक्षणाला समान महत्त्व आहे. त्यांची योग्य सांगड घालता आली पाहिजे.
 
नुसते मनोरंजन किंवा नुसते शिक्षण हे सर्वांगीण विकास करू शकत नाही. शिक्षणासोबत मनोरंजन, कला देखील जपली जाणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे दोहोंचे संतुलन साधता आले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

भारतीय सेवा सदनचे अध्यक्ष दिलीपराज गोयनका, उपाध्यक्ष आमदार गोपीकिशन बाजोरीया आणि नाशिक येथील मिरर फाऊंडेशनच्या अध्यक्षा नेहा खरे यांनी देखील विचार मांडले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अंजली राजवाडे यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. उद्घाटन सत्र दरम्यान गणेश वंदना, स्वागत गीत सादर करण्यात आले. तसेच ईशानी साठे ग्रुपने कथ्थक नृत्य परफॉर्मिंग आर्ट्स विभागाच्या विद्यार्थ्यांनी गीत सादर केले.
 
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शालिनी बंग डॉ. राधा सावजी यानी यांनी केले. तर स्नेहसंमेलनाचे समन्वयक प्रा. ललित भट्टी यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील बीसीयुडीचे डायरेक्टर डॉ. राजेश जयपुरकर, राष्ट्रीय सेवा योजनांचे समन्वयक डॉ. गणेश मालटे, भारतीय सेवा सदनचे उपाध्यक्ष रविंद्रकुमार गोयनका, सचिव आलोककुमार गोयनका यांच्यासह सर्व पदाधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थिनी, पालक उपस्थित होते. 
 
नेहाखरे यांनी साधला संवाद : नाशिकयेथील मिरर फाऊंडेशनच्या अध्यक्षा नेहा खरे यांनी विद्यार्थिनींसोबत संवाद साधत त्यांना उद्योजक होण्याचा सल्ला दिला. जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चिती, आत्मविश्वास, निरंतर प्रयत्न, अथक परिश्रम या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. स्त्रिया या अबला, रडक्या आहेत, ही संकल्पना आता बदलली आहे. 

आज महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. इतिहास घडवायचं असेल तर सुरूवात स्वत: पासून केली पाहिजे. सर्व लोक जे करतात, ते करण्यापेक्षा आपण इतरांपेक्षा वेगळे कसे ठरू शकतो याचा विचार केला पाहिजे. महाविद्यालयातील स्नेहसंमेलन, स्पर्धा हे चुका करण्याचे व्यासपीठ असते. येथे चुका सुधारण्यासाठी शिक्षक पाठीशी असतात. त्यामुळे या व्यासपीठाचा योग्य वापर करून जीवनात प्रगती केली पाहिजे.
 
जीवनात काय व्हायचे हे ध्येय शालेय जीवनातच ठरवून, ध्येय कधीपर्यंत पूर्ण व्हावे हे आधीच ठरवले पाहिजे. ध्येय गाठताना इतरांना देखील सोबत घेऊन जाता आले पाहिजे. कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन काम केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
 
सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थिनींनी सादर केला कलाविष्कार 
सांस्कृतिक कार्यक्रमात हिंदी, मराठी गीतांवर विद्यार्थिनींनी कलाविष्कार सादर केला. इंडिया वाले, उगवली शुक्राची चांदणी, आजा नचले, नगाडा संग ढोल, वाजले की बारा, छम छम करता, देश रंगीला, री चिरैय्या, ललाटी भंडार, मोरया मोरया, दिवाणी मस्तानी, पिंगा, बादल पे पाव है, यादीया, नाद खुळा, राधा नाचेगी, जगात गाजा वाजा अशा गीतांसह पोवाडा, लावणी, शेतकरी नृत्य सादर केले. एकपात्री, नाटक यातून समस्यांवर भाष्य केले, प्रबोधन केले. लग्न समारंभ यावरील फॅशन शो विविध राज्यातील लग्न पद्धतींचे दर्शन घडले. 
बातम्या आणखी आहेत...