आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकाेला- नागपूर विभागीय अायुक्तांनी घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला- सीसीटिव्ही कॅमेरा खरेदी घोटाळ्याप्रकरणी नागपूर विभागीय अायुक्तांच्या कक्षात सुनावणी झाली. अायुक्तांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. या घाेटाळ्याप्रकरणी फेर चाैकशीची घाेषणा राज्य विधी मंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात २५ मार्च राेजी ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली हाेती. 
 
जिल्हा नियाेजन समितीअंतर्गत नाविन्यपूर्ण याेजनेतून सीसीटिव्ही कॅमेरे खरेदी करण्यात अाले. खरेदी प्रक्रिया जिल्हा परिषदने राबवली. हे सीसीटिव्ही कॅमेरे , पंचायत समितीमध्ये बसवण्यात अाले. यासाठी २९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात अाला. सीसी टिव्ही कॅमेरा घाेटाळयाबाबत विधी मंडळाच्या नागपूर अधिवेशात अामदार रणधीर सावरकर यांनी मुद्या उपस्थित केल्याने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी उच्चस्तरीय चाैकशीचा अादेश दिला हाेता. त्यानुसार उपायुक्त (विकास) यांनी चाैकशी केली हाेती. मात्र चाैकशीबाबत अामदार सावकरसह इतरही अामदार समाधानी झाले नाहीत. त्यामुळे नागपूर विभागीय अायुक्तांकडे चाैकशी जबाबदारी साेपवण्यात अाली. त्यानुसार विभागीय अायुक्त अनुपकुमार यांनी गुरुवारी त्यांच्या कक्षात जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) मुख्य लेखा वित्त अधिकारी यांची चाैकशी केली. याबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला. 
वरिष्ठ अधिकारी चाैकशीच्या घेऱ्यात ? : सीसीकॅमेराखरेदी घाेटाळ्यात जिल्ह्यातील सर्वच गटविकास अधिकाऱ्यांची (बीडीअाे) चाैकशी झाली हाेती. ही चाैकशी अमरावती विभागीय अायुक्त कार्यालयातील उपायुक्तांनी केली हाेती. मात्र बिडीअाेंनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन केल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे; परंतु बिडीअाे ठामपणे थेट शासनाकडे अापली भूिमका मांडत नसल्याचे समजते. त्यामुळे नागपूर विभागीय अायुक्तांच्या चाैकशीत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चाैकशी हाेण्याची शक्यता वर्तवण्यात येत अाहे. अायुक्त अनूपकुमार हे अकाेल्यात जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत हाेते. त्यामुळे त्यांना अकाेल्यातील कार्यपद्धती माहीत अाहे, हे उल्लेखीय. 
बातम्या आणखी आहेत...