आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्ड्यांमुळे ट्रक पलटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूर्तिजापूर- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वरील नवसाळा फाट्याजवळच्या पुलावर असलेल्या खड्ड्यामुळे ट्रकचा पट्टा तुटल्याने हा ट्रक पलटी झाला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. सुदैवाने यामध्ये जिवीतहाणी झाली नाही. डहाणू वसई येथून चिक घेऊन नागपूरकडे जाणारा एमएच ०४ ईबी ३०१५ क्रमांकाचा ट्रक नवसाळा फाट्याजवळील पुलावर आला असता पुलावरील खड्ड्यात आदळल्याने या ट्रकचा पट्टा तुटला महामार्गावरील विरुद्ध बाजूने पलटी झाला.
याचवेळी नागपूरहून अकोल्याकडे शेतीसाठी लागणारी औषधे घेऊन येणारा ट्रक क्रमांक एमएच ०४ सीयू ६९५ हा पलटी झालेल्या ट्रकला येऊन भिडला. या ट्रकच्या कॅबिनचे नुकसान झाले. परंतु या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. या वेळी महामार्गावरील एका वाहतूक बंद झाली होती. शनिवारी सकाळी पलटी झालेला ट्रक क्रेनच्या साहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
खड्ड्यांमुळे चिकू घेऊन जाणारा ट्रक नवसाळाजवळ पलटी झाला आहे.