अकोला - लेझर किरणांद्वारे टॉन्सिलचे ऑपरेशन, नाकातील गाठी, मांस तथा जिभेवरील किंवा स्वरयंत्रावरील उद्भवलेल्या व्याधी, नाक, कान घसासंबंधित रोगांवरील किचकट शस्त्रक्रिया कशा पद्धतीने कराव्यात, यासंदर्भात देशभरातून आलेल्या विविध तज्ज्ञ डॉक्टरांना मार्गदर्शन केले. केडिया प्लॉट्स येथील लढ्ढा लेझर ईएनटी इन्स्टिट्यूटमध्ये दोन दिवसीय आठव्या राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. दोन दिवस ही कार्यशाळा चालणार असून, २० मार्चला या राष्ट्रीय कार्यशाळेचा समारोप होणार आहे. लेझर किरणांद्वारे शस्त्रक्रियासंबंधी जाणून घेण्यासाठी या कार्यशाळेत देशभरातून ४० प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. यामध्ये दोन प्रतिनिधी हे इराकवरून आले, हे विशेष.
दरम्यान, १९ मार्चला सकाळी आठ वाजता या कार्यशाळेला सुरुवात झाली. सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शस्त्रक्रिया केल्या. कार्यशाळेत प्रतिनिधींना प्रोजेक्टरवरून तथा थेट शस्त्रक्रियांचे प्रात्यक्षिक दाखवले जात आहे.
नाक, कान घसासंबंधित रोगांवर उपचार करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे. लेझर किरणांद्वारे या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. लेझरद्वारे होणाऱ्या शस्त्रक्रियेचे तंत्र इतर डॉक्टरांना अवगत व्हावे, या उद्देशाने मोदी इन्स्टिट्यूटमध्ये कार्यशाळेचे आयोजन केले. मुंबईचे लेझरतज्ज्ञ डॉ. मोरवानी, डॉ. सोनल मोदी अहमदाबादाचे डॉ. धवल हे शस्त्रक्रियेसंदर्भात प्रात्यक्षिक दाखवून या प्रतिनिधींना माहिती देत आहेत. दोन दिवसांत एकूण २० शस्त्रक्रिया होणार असून, यामधून प्रतिनिधींना शस्त्रक्रिया कशा कराव्यात, यासाठी मार्गदर्शन केले जाईल, असे मुख्य आयोजक मोदी यांनी सांगितले. या कार्यशाळेत विदेशातून आलेल्या प्रतिनिधींना अद्ययावत तंत्रज्ञान तज्ज्ञ डॉक्टर मॉडेलवर लेझर किरणांचा उपयोग करण्याचे शिकवतील.
लेझर शस्त्रक्रियेमुळे त्वरित मिळतो दिलासा
विदर्भात कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. कर्करोगावर उपचार या लेझर पद्धतीने अत्यंत सोईस्कर कसे आहे, हे या कार्यशाळेत प्रात्यक्षिकाद्वारे दाखवले जात आहे. नागरिकांना शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दिवस काढणे कंटाळवाणे वाटते. लेझर शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला त्वरित दिलासा होणारा रक्तस्त्राव यामुळे ही कार्यशाळा अतिशय उपयुक्त असल्याचे मोदी यांनी सांगितले. लढ्ढा इन्स्टिट्यूटची कार्यशाळा; शस्त्रक्रिया