आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक हजार ९१३ प्रकरणे काढली निकाली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण तथा महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशावरून अकोला वाशीम जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये अनेक प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्यात आला आहे. त्यात हजार ९१३ प्रकरणे निकाली काढण्यात आली, तर ७५ दाखलपूर्व प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. दरम्यान, कोटी ९८ हजार ७३८ रकमेची आपसातील तडजोड या लोकअदालतमध्ये करण्यात आली.
अकोला वाशीम जिल्ह्यातील सर्वच तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आपसी निपटारा करण्यासाठी शनिवारी लोकअदालतीचे आयोजन प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. एन. तांबी यांच्या मार्गदर्शनामध्ये करण्यात आले होते. यामध्ये न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांचा निपटारा करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. त्यामुळेच एक दिवसीय लोकअदालत यशस्वी ठरली असून, यामध्ये हजार ९१३ प्रकरणांचा जागेवरच निपटारा करण्यात आला, तर न्यायालयात दाखल करण्यापूर्वीच्या ७५ प्रकरणांचा निकाल पूर्वीच काढण्यात आला. या लोकअदालतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी. एम. बाडगी, प्राधिकरण पॅनलचे सदस्य म्हणून काम पाहणारे न्यायाधीश, वकील, समाजसेवक यांचे चांगले सहकार्य लाभले. सर्वांच्या सहकार्याने लोकअदालतमध्ये अनेक प्रकरणांचा तत्काळ निपटारा करण्यात आला, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी. एम. बाडगी यांनी दिली.

लोकअदालतीबाबतीत जिल्हा अग्रेसर
लोकअदालतीचे आयोजन दोन्ही जिल्हा मिळून नेहमीच केले जाते. त्यात शेकडो प्रकरणे आजपर्यंत निकाली निघाली आहेत. सुटीच्या दिवशी लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात येत असतानाही मोठ्या संख्येने न्यायाधीश, वकील आणि नागरिकांचे सहकार्य मिळत असल्यामुळे लोकअदालतीचे प्रकरणांचा निपटारा करण्यात जिल्हा अग्रेसर राहिला आहे.