आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नैसर्गिक आपत्तीत मृत्यू; कुटुंबियांना ४० लाख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पूरस्थिती वीज पडून मृत झालेल्या दहा व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनाने ४० लाख रुपयांची मदत केली आहे. गेल्या चार महिन्याचा हा आकडा आहे.
एक जून ते ३० सप्टेंबर २०१६ या काळात अकोला तालुक्यातील सहा आणि अकोट तालुक्यातील चार जणांचा नैसर्गिक आपत्तीने मृत्यू झाला. यातील सात जण पुरात वाहून गेले होते. तर तिघांवर वीज कडाडली होती. या सर्वांच्या कुटुंबियांना शासनाने प्रत्येकी चार लाख याप्रमाणे ४० लाख रुपयांची मदत केली आहे. अकोला जिल्ह्यातील टाकळी पोटे येथील रहिवासी अंबादास इंगळे अशोक इंगळे यांचा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वीज पडून मृत्यू झाला होता. त्यानंतरच्या काळात महेश निंभोकार (मलकापूर), रामदास गोपनारायण (रामगाव), प्रकाश राठोड (गांधीग्राम) सनी बमन (बापुनगर) हे चौघे पुरात वाहून गेले.याच काळात अकोट तालुक्यातील सचिन पिंजरकर (खेर्डा) यांचा वीज पडून मृत्यू झाला. तर बाबुराव घनबहादूर (वरुळ जऊळका), हुसेन शाह हसन शाह (केळीवेळी) गत महिन्यात देविदास बेंडे (केळीवेळी) यांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू ओढवला. दरम्यान जिल्हा प्रशासनाने या सर्व घटनांची त्वरेने चौकशी करुन त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाखांची मदत केली.

पहिल्यांदाच लागू झाला एनडीआरएफ
वीज पडून मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या कुटुंबियांना यापूर्वी राज्य शासनाच्या निकषांनुसारच मदत दिली जायची. गेल्या दोन वर्षांपूर्वी पहिल्यांदाच ही बाब नॅशनल डिजास्टर रेस्क्यू फंडमध्ये (एनडीआरएफ) समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे त्यात मृत होणाऱ्यांना आता केंद्र शासनाच्या निकषानुसार वाढीव मदत दिली जाते.
बातम्या आणखी आहेत...