आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रसंतांच्या विचारांचे चिंतन, आचरण आज काळाची गरज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेतून समाजाला िदशा देण्याचे काम केले आहे. त्यांचे विचार हे नुसते वाचण्यासाठी, अभ्यासनासाठी नाही, तर त्याचे चिंतन होणे आवश्यक आहे. आजच्या समाजाची ढासळत चाललेली स्थिती पाहता समाजाला मार्ग दाखवण्याचे काम फक्त ग्रामगीताच करू शकते. राष्ट्रसंतांच्या विचारांचे चिंतन आचरण ही आज काळाची गरज बनली आहे, असा सूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाच्या उद््घाटन सत्रात उमटला. 


अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवा मंडळ गुरुकुंज अंतर्गत वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने स्वराज्य भवनाच्या प्रांगणात आयोजित पाचव्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी, २५ नोव्हेंबर रोजी झाले. दोन दिवसीय हे संमेलन जगाचा पोशिंदा बळीराजाला समर्पित केले. संमेलनाचे उद््घाटन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक विलास खर्चे यांच्या हस्ते झाले. यावेळी संमेलनाध्यक्ष सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज चिंचोळकर, स्वागताध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक कृष्णा अंधारे, प्रभात चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष साहेबराव नारे, ज्येष्ठ भजन प्रचारक विजय मुंडगावकर, आचार्य हरिभाऊ वेरुळकर, ज्येष्ठ राष्ट्रीय कीर्तनकार आमले महाराज, उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, आजीवन प्रचारक डॉ. भास्करराव विघे, आमदार गोवर्धन शर्मा, काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष बबनराव चौधरी, प्रभात किड्चे संचालक डॉ. गजानन नारे, राष्ट्रसंत विचार अभ्यासक ज्ञानेश्वर रक्षक, माजी प्रांत सेवाधिकारी मुगुटराव बेले, सामाजिक कार्यकर्ते डॉ. संतोष हुशे, मनोहर हरणे, अॅड. विनोद साकरकर, तिमांडे महाराज, नगरसेविका उषा विरक, नॅशनल मिलीटरी स्कूलच्या प्राचार्या सिसोदीया, माजी महापौर सुमन गावंडे, संजय चौधरी, डॉ. ज्ञानेश्वर मिरगे, आयोजन समितीचे अध्यक्ष रामेश्वर बरगट यांची उपस्थिती होती. 


संमेलनाच्या पहिल्या दिवशी विविध सत्रांमधून राष्ट्रसंतांच्या विचारांवर चिंतन करण्यात आले. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी देखील विविध सत्रे, परिसवंदाची रेलचेल राहणार आहे. सकाळी ११ वाजता ‘ग्रामगीतेतील शेतीविषयक धोरण’ याविषयावर परिसंवाद होईल. ‘राष्ट्रसंतांना अपेक्षित महिलोन्नती’ या विषयावर दुपारी १.३० वाजता महिलांचा परिसंवाद होणार आहे. दुपारी वाजता होणाऱ्या समारोपीय सत्राला संमेलनाध्यक्ष सत्यपाल महाराज, स्वागताध्यक्ष कृष्णा अंधारे, पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, आचार्य हरिभाऊ वेरूळकर, डॉ. भास्करराव विघे, सुधाकर गणगणे, गुलाबराव गावंडे, बालमुकुंद भिरड, गंगाधर पाटील, डॉ. पुरूषोत्तम तायडे, अॅड. मोतीसिंह मोहता, महादेवराव भुईभार, अॅड. रामसिंह राजपूत, डॉ. रघुनाथ वाडेकर, किशोर वाघ, देविदास पाटील, दिलीप आसरे, पंकज जायले यांची विशेष उपस्थिती राहील. 
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे शनिवारी उद््घाटन झाले. याप्रसंगी दीपप्रज्वलन करताना समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज, शेजारी आचार्य हरिभाऊ वेरुळकर, आ. शर्मा आदी. 

बातम्या आणखी आहेत...