आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईद मिलादनिमित्त अाज गरजूंना 500 ब्लँकेटचे वि‍तरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - थंडीपासूनसंरक्षण हाेण्यासाठी गरजूंना ५०० ब्लँकेटचे वि‍तरण करण्याचा नि‍र्णय कच्छी मेमन जमातने घेतला अाहे. या कार्यक्रमाचे अायाेजन साेमवारी ईद-ए-मिलादच्या नि‍मित्ताने केएमटी हाॅलमध्ये सकाळी १० वाजता केले अाहे.
सध्या थंडीचा जोर वाढतच अाहे. अार्थिकदृष्टया सक्षम गरम कपडे खरेदी करु शकतात. मात्र गरीबांना गरम कपडे मिळत नाहीत. त्यामुळे सामाजिक कर्तव्य भावनेतून गरजंूना ब्लँकेट वि‍तरण करण्याचा नि‍र्णय कच्छी मेमनने घेतला. गत वर्षी कच्छी मेमन जमातने शासकीय रुग्णालयात डस्टबीनचे वि‍तरण केले हाेते. मिळत असलेल्या पैशांचा उपयाेग गरजूंच्या मदतीसाठी व्हावा, या उद्देशाने कच्छी मेमन जमातच्या पदाधिकाऱ्यांनी ब्लँकेट िवतरणाचा नि‍र्णय घेतला. या कार्यासाठी विदर्भ मेमन जमातचे अध्यक्ष बिलाल ठेकिया, अध्यक्ष जावेद जकारिया,उपाध्यक्ष साजिद नाथानी, सचिव सलीम गाजी, सहसचिव वाहिद मुसानी, कोषाध्यक्ष हाजी सादिक लाशकारिया, मुतवाली एजाज सूर्य, नायाब मुतवाली हाजी यासीन बचाव, सदस्य हाजी हनीफ मलक, हाजी फारूक भुरानी, जकारिया डोकडिया ,माजिद भुरानी, हाजी इकबाल विन्धनी, इकबाल डाेकाडीया, हाजी रफीक गाजी, हाजी अफजल गाजी, हाजी इल्यास जुडा, मुस्ताक रस्सीवाला, हाजी असलम गाजी, इक्बालभाई गनोदवाला, इब्राहिमभाई प्लाटवाले, जावेद थडी, शफी सूर्य, इलियास सूर्य अादी परिश्रम करीत अाहेत. बिलाल ठेकिया यांनी ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमात ब्लँकेटचे वि‍तरण केले अाहे.

मान्यवरांची उपस्थिती
ब्लॅंकेट वि‍तरण कार्यक्रमाला अति. पोलिस अधीक्षक िवजयकांत सागर, माजी राज्यमंत्री अजहर हुसेन, नगरसेवक साजिद खान पठाण, नकिर खान, रफिक िसद्धीकी, एेन-ऊल हक कुरेशी, मिरवणूक समितीचे प्रमुख हाजी मुदाम, हाजी अनिस, चाँद खान, अब्दुल्ला खान, अब्दुल रहेमान खान अादी उपस्थित राहतील. तर रात्री बसस्थानक, रेल्वे स्टेशनसह इतर िठकाणी ब्लँकेट वाटप होईल.
बातम्या आणखी आहेत...