आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला वन विभागाचा वनौषधी उद्यानाचा खर्च पाण्यात; गाजर गवत वाढले, परिसरात झाडांची कत्तल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - राष्ट्रीयमहामार्गावरील रिधोरा येथून जवळच असलेल्या वन विभागाच्या लोणी-बारलिंगा वनक्षेत्र परिसरात लाखो रुपये खर्च करून वनौषधीची लागवड करण्यात आली आहे. मात्र, या वनौषधी उद्यानाकडे वन विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. रोपांना पाणी मिळत नसल्याने रोपे सुकत चालली असून, गाजर गवतही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिणामी नागरिकांचे विविध आजार दूर करणाऱ्या या वनौषधींनाच आज एक प्रकारे औषधींची गरज भासत आहे.

वन विभाग त्यांच्याच अखत्यारीत येणाऱ्या सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणात वृक्षलागवडीसाठी प्रयत्न केले जातात. जास्तीत जास्त वन क्षेत्र टिकून राहावे, यासाठी प्रयत्न केले जातात. त्यामुळेच एखाद्या जलप्रकल्पांमुळे वनक्षेत्र बुडीत क्षेत्रात जात असेल तर वेळप्रसंगी जल प्रकल्पांचे कामही रद्द करण्यात येते. वन विभागाची अकोला जिल्हा परिसरात मोठ्या प्रमाणात जमिन आहे. या जमिनीवर विविध झाडांचे बन आहे. याच अनुषंगाने रिधोरा गावापासून काही किलोमिटर अंतरावर असलेल्या लोणी-बारलिंगा वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्राच्या जागेपैकी काही हेक्टर जागा सामाजिक वनीकरणाला नर्सरीसाठी देण्यात आली आहे, तर उर्वरित जागेत सुईबाभळीसह विविध झाडांचे बन आहे. यापैकीच सुई भाबळीच्या बनात वनऔषधी लागवड करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला होता. वन विभागाच्या माहितीनुसार दोन एकर जागेत वनौषधीची लागवड करण्यात आली आहे. यासाठी सुईबाभळीची झाडे काढण्यात आली. या जागेत जांभूळ, आवळा, शतावरी, कडू बदाम, कडूनिंब आदी विविध वनौषधीची लागवड केली आहे.
रस्ताही मातीचाच
वनौषधी उद्यानात रस्ता केला आहे. मात्र अद्यापही या रस्त्याचे खडीकरण झालेले नाही. केवळ काळ्या मातीचा रस्ता तयार केला आहे. यावरून या वनौषधी उद्यानाकडे वन विभागाचे किती लक्ष आहे ? ही बाब लक्षात येते.

पाण्याचा अभाव
वनौषधी उद्यानासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्षात या रोपांना गेल्या कित्येक दिवसापासून पाणीच दिलेले नसल्याची बाब प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली असता आढळून आले. वन विभागाने बोअर असल्याचा दावा केला आहे.

झाडाची कत्तल सुरुच
वनौषधी उद्याना लगत वन विभागाची पडीत जमिन आहे. त्यावर सुई बाभळ, बाभळीसह विविध झाडे आहेत. तसेच गवतही वाढले आहे. यापैकी अनेक झाडे अवैधरित्या कटाई सुरु आहे. झाडे तोडल्याची खुण दिसू नये, यासाठी झाड तोडलेल्या जागी गवताचा भारा टाकला जात आहे.
वनआैषधीच्या झाडांची अवैधरित्या कतत्ल केली जात आहे.
सुई बाभळपरस्पर विक्री झाल्याचा प्रकार झालेला नाही. तसेच रोपांना नियमित पाणी देण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. आता याकडे लक्ष देऊन कर्मचाऱ्यांना वनौषधींच्या रोपांची निगराणी करण्याचे तसेच गाजर गवत काढण्याची सूचना दिली जाईल. प्रकाशलोणकर, उपवन संरक्षक वन विभाग
बातम्या आणखी आहेत...