आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवजात मुलीस नालीत टाकून मातेचा पोबारा, मूलगी जिवंत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूर्तिजापूर - येथील स्टेशन विभागात आज, २१ सप्टेंबरच्या पहाटे नुकतेच जन्मलेल्या मुलीस नालीत टाकून देऊन एका अज्ञात निर्दयी मातेने पोबारा केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली. विशेष म्हणजे रात्रभर मूल नालीत राहूनही जिवंत राहिले. या बालिकेची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

स्टेशन विभागातील स्वागत लॉजच्या पाठीमागील नालीची सफाई करण्यासाठी सोमवारी सकाळी वाजताच्या सुमारास सफाई कर्मचारी येऊन सफाई करत असताना त्यास अचानक नालीत बाळ दिसले. शरीराचा काही भाग नालीच्या पाण्यात आणि डोके मात्र वर अशा अवस्थेत असलेले बाळ पाहताच गांगरून गेलेल्या सफाई कर्मचाऱ्याने बाजूलाच राहणाऱ्या नगरसेविका अनिता अव्वलवार यांना माहिती दिली. त्यानंतर अमित अव्वलवार काही नागरिकांनी तत्काळ बाळाला बाहेर काढले.

या बालिकेचा जन्म रात्री ११ ते १२ वाजताच्या दरम्यान झाला असून, जन्म होताच तिला नालीत टाकून अज्ञात मातेने पोबारा केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अनैतिक संबंधातून बाळ जन्मल्याने असा अघोरी प्रकार करणाऱ्या मातेने निर्दयतेचा कळस गाठल्याचे म्हटल्या जात होते. याप्रकरणी मूर्तिजापूर पोलिस स्टेशनला अपराध क्रमांक २५३/१५ कलम ३१७ अन्वये अज्ञात मातेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निर्दयी मातेचा पोलिसांनी लवकरात लवकर शोध घेऊन तिच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

ऑटोतून आलेले महिला, पुरुष कोण?
२०सप्टेंबरच्या रात्री ११ वाजताच्या दरम्यान एका ऑटोतून काही महिला पुरुष एका रुग्णास घेऊन आले होते. मात्र, संबंधित रुग्णालयाचे डॉक्टर गावी गेल्याचे सांगितल्यानंतरही बाळंतपणासाठी आणलेल्या रुग्णाला घेऊन दुसऱ्या रुग्णालयात गेले नाही. जवळपास एक ते दीड तास ते तेथेच गल्लीत थांबून राहिल्याचे समजले. संबंधित दवाखाना घटनास्थळ जवळच आहे, हे विशेष.

डॉक्टरांनी दिला माणुसकीचा परिचय
हीबालिका जिवंत असल्याने तिला ताबडतोब डॉ. अवघाते यांच्या बाल रुग्णालयात दाखल केले. त्यांनीही माणुसकीचा परिचय देत सर्व परिस्थिती जाणून घेऊन बालिकेला अतिदक्षता कक्षात ठेवून उपचार सुरू केले. दुपारपर्यंत बालिकेच्या प्रकृतीत सुधारणा हेाऊन सध्या प्रकृती स्थिर आहे.