आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन जिल्हा निर्मितीला पुन्हा वेग, राज्य सरकारने नेमली मुख्य सचिवांची समिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खामगाव- राज्यातील अनेक जिल्ह्यांचे विभाजन करण्याची मागणी अनेक वर्षांपासून हाेत असताना फडणवीस सरकारने अाता त्यासाठी पुढाकार घेतला अाहे. प्रस्तावित नवीन २२ जिल्हे निर्मितीसाठी सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली अाहे. त्यात वित्त, महसूल व नियोजन विभागाचे सचिव, विभागीय आयुक्त यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान, मराठवाड्यातील नांदेड, बीड व लातूर या तीन जिल्ह्यांचा त्यात समावेश अाहे. फडणवीस सरकारने राज्यात २२ जिल्हे व ४९ तालुक्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव तयार केला आहे. यासाठी गठित केलेल्या समितीला ३१ डिसेंबर बरपर्यंत अहवाल सादर करण्याचे िनर्देश देण्यात आले आहेत. मराठवाड्यातील नांदेड व बीड जिल्ह्याचे विभाजन करून अनुक्रमे किनवट व अंबाजाेगाई या नवीन जिल्ह्यांची निर्मिती करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून हाेत अाहे. अाजवरच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत संबंधित जिल्ह्यांना अाश्वासितही केले हाेते, मात्र निर्णय अजूनही झालेला नाही. राज्यात १९८८ नंतर दहा जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या ३६ जिल्हे व २८८ तालुके आहेत. मात्र, सध्या अस्तित्वात असलेले जिल्हे व काही तालुक्यांची ठिकाणे भौगोलिकदृष्ट्या गैरसोयीची असल्याचे सांगून विविध पक्षांच्या नेत्यांनी जनतेच्या मागणीनुसार
जिल्हा व तालुकानिर्मितीची मागणी केली अाहे.
कर्जाचा डाेंगर, तरीही खर्चाची तयारी : महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या दालनात बुधवारी नवीन जिल्हा निर्मितीच्या विषयावर बैैठक पार पडली. एका जिल्ह्याच्या निर्मितीसाठी किमान तीनशे पन्नास कोटी रुपये खर्च येतो. राज्य सरकारवर सध्या तीन लाख कोटींहून अधिक कर्ज आहे.
अशा परिस्थितीत जिल्हा निर्मितीवर खर्च करणे शक्य नाही, परंतु सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची मागणी असल्याने सरकारने २२ नवीन जिल्हे निर्मितीच्या दिशेने पाऊल उचलले आहेत.
मूळ जिल्हे व प्रस्तावित जिल्हे
बुलडाणा खामगाव
यवतमाळ पुसद
अमरावती अचलपूर
भंडारा साकोली
चंद्रपूर चिमूर
गडचिरोली अहेरी
जळगाव भुसावळ
लातूर उदगीर
बीड अंबाजोगाई
नांदेड किनवट
नगर शिर्डी, श्रीरामपूर
नाशिक मालेगाव, कळवण
सातारा माणदेश
पुणे शिवनेरी
पालघर जव्हार
ठाणे कल्याण
रत्नागिरी मानगड
रायगड महाड