Home | Maharashtra | Vidarva | Akola | Newborn Baby Dead Body Found In Akola

रस्त्याच्या कडेला डब्ब्यात मिळाला अर्भकाचा मृतदेह, सोबत असलेल्या चिठ्ठीत लिहिले होते...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 09, 2017, 04:23 PM IST

मलकापूर येथे रविवारी दुपारी स्मशानाजवळ रस्त्याच्या कडेला एका अर्भकाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडी

 • Newborn Baby Dead Body Found In Akola
  स्थानिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली होती.
  अकोला- मलकापूर येथे रविवारी दुपारी स्मशानाजवळ रस्त्याच्या कडेला एका अर्भकाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी पोहचले. पोलिस या अर्भकाच्या मातेचा शोध घेत आहेत.
  नवजात अर्भकाच्या शरीरावर लावले होते असे लेबल
  - मलकापूर येथील स्मशानाजवळुन काही लोक चालले होते. त्याचवेळी त्यांना रस्त्याच्या कडेला एक बॉक्स दिसला.
  - लोकांनी हा बॉक्स उघडून पाहिला असता त्यात कपड्यात गुंडाळण्यात आलेला एका नवजात अर्भकाचा मृतदेह होता. त्याच्या शरीरावर हॉस्पीटलचे लेबल लावण्यात आले होते.
  - लेबलवर नवजात अर्भकाच्या मातेचे नाव ललित पडघम असे लिहिण्यात आले होते. सोबत जन्मदिवसही लिहिण्यात आला होता. याशिवाय या अर्भकाचे वजन (750 ग्रॅम) ही लिहिण्यात आले होते.
  - पोलिसांनी चौकशी केली पण कुणालाही माहिती नव्हते की या ठिकाणी नवजात अर्भकाला कुणी ठेवले.
  - पोलिस आता या बॉक्समध्ये सापडलेल्या चिठ्ठीच्या आधार तपास करत आहेत.
  पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
 • Newborn Baby Dead Body Found In Akola
  अर्भकाचा मृतदेह स्मशानाजवळ एका बॉक्समध्ये ठेवण्यात आला होता.
 • Newborn Baby Dead Body Found In Akola
  या चिमुकल्याचा जन्म रविवारी सकाळी झाला असल्याचा अंदाज आहे.
 • Newborn Baby Dead Body Found In Akola
  पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
 • Newborn Baby Dead Body Found In Akola
  चिमुकल्याच्या शरिरावर असलेल्या लेबलच्या आधारे तपास सुरु करण्यात आला आहे.
 • Newborn Baby Dead Body Found In Akola
  पोलिस या अर्भकाला जन्म देणाऱ्या मातेचा शोध घेत आहेत.

Trending