आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Newborn Child Mortality Declined In The District

नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण जिल्ह्यामध्ये घटले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - जिल्ह्यामध्ये गेल्या चार वर्षांच्या कालावधीत नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण घटले अाहे. सन २०१०-११ च्या तुलनेत घटून हा आकडा २०१४-१५ अखेरपर्यंत १७ वर आला आहे. दुसरीकडे गेल्या पाच वर्षांमध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेच्या टक्केवारीत मात्र घट झाली आहे. सन २०१४-१५ अखेर जिल्ह्यात फक्त ७३ टक्के कुटुंबांनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्याची शासकीय आकडेवारी आहे. ही बाब आरोग्य विभागासाठी डोकेदुखी ठरत आहे.
ग्रामीण भागातील गर्भवती महिलांना सकस आहार मिळत नसल्याने वेळेवर तपासणी होत नसल्याने बाल मृत्यूचे प्रमाण वाढत चालले होते. मात्र, गर्भवतींची नियमित तपासणी त्यांना लोहयुक्त गोळ्या देण्याचे काम शासनाने राष्ट्रीय बाल आरोग्य अभियानांतर्गत सुरू केल्यानंतर नियमित तपासणी औषधोपचार होऊ लागला. ग्रामीण भागात अंगणवाडी सेविकांमार्फत सकस आहारही पुरवला जाऊ लागला. तसेच प्रसूती रुग्णालयात होत आहे. त्यातच बाळाच्या प्रकृतीकरिता विशेष बेबी केअर युनिटही सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात बुलडाणा, शेगाव, खामगाव येथे हे युनिट सुरू असल्याने बालकांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्याचा परिणाम बालमृत्यू दरावर झाला आहे. सन २०१४- १५ अखेर हजारामागे फक्त १७ बालमृत्यू झाल्याचे समोर आले.

ग्रामीण भागात मृत्यूचे प्रमाण अधिक : जन्मताचबालमृत्यू प्रमाणात ग्रामीण भाग पुढे आहे. वर्षभरात ग्रामीण भागात ५६, तर शहरी भागात १३ मृत्यू झाले आहेत. गर्भवती महिलांच्या मृत्यूचे प्रमाणही कमी होत आहे. वर्षभरात दोन गर्भवती महिलांचा मृत्यू झाला आहे.
ग्रामीण भागातील गर्भवती महिलांना सकस आहार मिळत नसल्याने वेळेवर तपासणी होत नसल्याने बाल मृत्यूचे प्रमाण वाढत चालले होते. मात्र, गर्भवतींची नियमित तपासणी त्यांना लोहयुक्त गोळ्या देण्याचे काम शासनाच्या वतीने सुरू करण्यात आल्यामुळे गर्भवती महिलांचा मृत्यू होण्यासोबतच बालमृत्यूचेही प्रमाण घटले आहे. मात्र, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाण मागील काही वर्षांच्या तुलनेत घटल्याने आरोग्य विभागासाठी डोकेदुखी बनली आहे. आरोग्य विभागाला दिलेले उद्दिष्टही पूर्ण करण्यात यश आले नाही. त्यामुळे यासाठी जनजागृती करण्याची आवश्यकत आहे.

कमी वजन, श्वासोच्छवासामुळे होतात बालमृत्यू
जन्मताच बालकाचा मृत्यू झाल्याचे प्रकार सध्या घडतात. कमी वजनामुळे किंवा श्वासोच्छवासामुळे बालमृत्यू होतात. हे प्रमाण वर्षभरात ६९ इतके आहे. बुलडाणा, चिखली, लोणार, नांदुरा तालुक्यात ६, सिंदखेडराजा, मलकापूर तालुक्यात ४, संग्रामपूर जळगाव जामोद तालुक्यात ५, मोताळा तालुक्यात ३, मेहकर तालुक्यात २, शेगाव देऊळगावराजा तालुक्यात एका बालकाचा जन्मताच मृत्यू झाला आहे.

शासनाच्या विविध योजनांमुळे बालमृत्यूचे प्रमाण घटले आहे
^माताबालकांचा मृत्यू हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, शासनाच्या विविध योजनांमुळे या मृत्यूच्या प्रमाणात कमालीची घसरण झाली आहे. ग्रामीण भागात विशेष करून या योजना मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहेत. डॉ. शिवाजीराव पवार, जिल्हाआरोग्य अधिकारी.

७३% - कुटुंबांनीकेलेे कुटुंबनियोजन
२६८५४ - ग्रामीणभागात झाल्या प्रसूती
१३,०८१ - शहरी भागात झाल्या प्रसूती
३९,९३५ - प्रसूतीवर्षभरात झाल्या आहेत.
३९ - हजारप्रसूती वर्षभरात