आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळफास लावून माहेरात नवविवाहितेची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट - पैशांच्या लालसे पोटी सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून अकोट तालुक्यातील बळेगाव येथील एका नवविवाहितेने गळफास घेऊन माहेरी मोरथ येथे शुक्रवारी आत्महत्या केली. याप्रकरणी पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महागाव तालुक्यातील मोरथ येथील देवानंद हिंगमिरे यांची मुलगी रेणू वय २४ हिचा विवाह १३ जून २०१५ रोजी बळेगाव ता. अकोट येथील अभियंता असलेल्या नीलेश उर्फ नंदकुमार आवटे यांच्याशी झाला. सुरुवातीपासूनच रेणू नीलेश आवटे हिचा हुंड्यासाठी शारीरिक मानसिक छळ करण्यात येत होता. दिवाळीला रेणू माहेरी मोरथ येथे आली. त्यानंतर तिने सासरी जाण्यास नकार दिला.

उद्या तिचा पती नीलेश नेण्याकरिता मोरथ येथे येणार हे कळताच रेणूने ११ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घरातच गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी रेणूच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या पती नीलेश, सासरे परशराम आवटे, सासू सुलोचना आणि नणंद मालाबाई यांच्याविरुद्ध महागाव पोलिसांनी भादंवि ४९८(अ),३०६ नुसार गुन्हे दाखल केले आहेत.
बातम्या आणखी आहेत...