आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील गावांची संख्या आता 1009 वरून पोहोचली 1012 वर; तीन महसूली गावांची भर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जिल्हाप्रशासनाचा सततचा पाठपुरावा भूमी अभिलेख खात्याने राबवलेल्या उत्कृष्ट अभियानामुळे जिल्ह्यात तीन नव्या महसुली गावांची भर पडली आहे. या नव्या रचनेमुळे जिल्ह्यातील गावांची एकूण संख्या १००९ वरून १०१२ वर पोहोचली आहे. 

नव्याने भर पडलेली ही गावे अकोट बार्शिटाकळी तालुक्यातील आहेत. अकोट तालुक्यात विविध प्रकल्पांसाठी नागरिकांच्या जमिनी घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे गावांची फेररचना होत असून, काही पुनर्वसित गावांचा जन्म झाला आहे. यातील दोन गावांना अलीकडेच महसूली गावांचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे तालुक्यातील गावांची संख्या १८३ वरुन १८५ वर स्थिरावली. 

त्याचप्रमाणे बार्शिटाकळी तालुक्यातील गावांची संख्याही १५९ वरुन १६० वर पोहोचली आहे. या तालुक्यात मुंगसाजी नगर हे नवे महसुली गाव म्हणून उदयास आले आहे. पूर्वी ते दुसऱ्या गावाशी जोडले गेले होते. परंतु, लोकसंख्या, मानव विकास निर्देशांक आणि इतर सोई-सुविधांच्या आढाव्यानंतर जिल्हाधिकारी यांनी त्यास महसुली गावाचा दर्जा देण्याची प्रक्रीया सुरु केली. या प्रक्रियेचाच एक भाग म्हणून भूमी अभिलेख कार्यालयामार्फत अकोट आणि बार्शिटाकळी या दोन तालुक्यांतील तिन्ही गावांचे प्रारंभी प्राथमिक आणि कालांतराने अंतीम सर्वेक्षण पूर्ण करुन तसा अहवाल जिल्हा प्रशासनाला सोपविण्यात आला.या अहवालाच्या अाधारे तिन्ही गावांना महसुली गावांचा दर्जा बहाल करण्यात आला असून तशा नोंदी शासन दरबारी घेण्यात आल्या आहेत. भूमी अभिलेखच्या सर्वेक्षणामुळे या गावांतील घरे, कार्यालये, शाळा, मंदिरे, शेती अशा अचल संपत्तीची वर्गवारी निश्चित करण्यात आली असून नागरिकांना त्यांचे पीआर कार्डही देण्यात आले आहेत. ही गावे महसुली गावे म्हणून घोषित झाल्यामुळे स्वतंत्र गावांसाठी असलेल्या योजना शासकीय सवलती तेथील नागरिकांना लागू झाल्या आहेत. 
 
अंतिम सर्वेक्षण 
भूमी अभिलेख कार्यालयामार्फत अकोट आणि बार्शिटाकळी या दोन तालुक्यांतील ितन्ही गावांचे प्रारंभी प्राथमिक आणि कालांतराने अंतीम सर्वेक्षण पूर्ण करुन तसा अहवाल िजल्हा प्रशासनाला सोपविण्यात आला. या अहवालाच्या अाधारे तिन्ही गावांना महसुली गावांचा दर्जा बहाल करण्यात आला. 

असा असतो प्रवास 
एखाद्या गावाला महसुली गावाचा दर्जा देण्यासाठी एकतर गावकऱ्यांतर्फे तशी मागणी केली जाते किंवा पात्रतेचे निकष पूर्ण होताना िदसल्यास जिल्हा प्रशासनातर्फे तशी कारवाई सुरु करण्यात येते. जिल्ह्यातील वरील गावांच्या संदर्भात प्रशासनाने स्वत:हून पुढाकार घेऊन कारवाई केली आहे. 
बातम्या आणखी आहेत...