आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्याची 2.68 % भरारी, 23 हजार 874 विद्यार्थी झाले उत्तीर्ण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निकालानंतर विद्यार्थिनींनी फेर धरून जल्लोष केला. - Divya Marathi
निकालानंतर विद्यार्थिनींनी फेर धरून जल्लोष केला.
अकोला - गतवर्षीच्या तुलनेत २.६८ टक्क्यांनी भरारी घेत अकोला जिल्ह्याने यावर्षीचा दहावीचा निकाल ८४.०२ टक्क्यांवर पोहोचवला आहे. म. रा. माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज, मंगळवारी दुपारी दहावीच्या निकालाची घोषणा केली. 
 
यानुसार २८ हजार ४१३ विद्यार्थ्यांपैकी २३ हजार ८७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ८४.०२ टक्के असून, गतवर्षी ती ८१.३४ वर थांबली होती. फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये यावर्षीची दहावीची परीक्षा घेतली. सरासरीच्या तुलनेत निकाल आठवडाभराने उशीरा आला. परंतु, निकालातील भरघोस टक्केवारीने काही दिवसांपासून सुरू असलेले संभ्रमाचे ढग दूर सारत विद्यार्थ्यांमध्ये नवा जल्लोष पेरला आहे. अकोला जिल्ह्यातून यावर्षी १५ हजार ३३ मुले १३ हजार ४६२ मुली अशाप्रकारे २८ हजार ४९५ विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेचे अर्ज दाखल केले होते. 
परंतु, ऐन वेळेवर २८ हजार ४१३ विद्यार्थ्यांनीच परीक्षा दिली. त्यापैकी उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या २३ हजार ८७४ वर थांबली आहे. जिल्ह्यातील ४४१ शाळांतून या विद्यार्थ्यांनी दहावीचे धडे घेतले.  पुनर्परीक्षार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ३९.५१: जिल्हाभरातीलअंदाजे ४५० शाळांमधून हजार ८९ अनुत्तीर्ण (माजी) विद्यार्थ्यांनीही या परीक्षेचा अर्ज भरला होता. त्यापैकी अवघे सहा विद्यार्थी वगळता हजार ८३ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. परंतु, हजार २१८ विद्यार्थ्यांनाच यश प्राप्त झाले. उत्तीर्णतेची ही टक्केवारी ३९.५१ एवढी आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने पुरवणी परीक्षेचा अर्ज दाखल करावा लागणार आहे. 
 
सर्वाधिक गुणी विद्यार्थी अकोल्यात : जिल्ह्यात सर्वाधिक ८५.०७ टक्के विद्यार्थी अकोला तालुक्यातून उत्तीर्ण झाले असून, सर्वात कमी ८०.५१ टक्के विद्यार्थी तेल्हारा तालुक्यातून उत्तीर्ण झाले आहेत. अकोला तालुक्यातून १० हजार ९८० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी हजार ३४१ विद्यार्थी यशस्वी झाले. इतर सातही तालुक्यांच्या तुलनेत ही संख्या सर्वात जास्त असल्यामुळे सर्वाधिक गुणी विद्यार्थी अकोला तालुक्यात आहेत, असे म्हणायला वाव आहे. 
 
गैरमार्गाचा अवलंबही अकोल्यातच सर्वाधिक : म.रा.माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अमरावती विभागीय कार्यालयाशी वऱ्हाडातील पाचही जिल्हे संलग्न आहेत. यापैकी अकोला जिल्ह्यातील सर्वाधिक ३५ विद्यार्थ्यांनी परीक्षेदरम्यान गैरमार्गाचा अवलंब केला. ही संख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. विशेष असे की यापैकी एकही विद्यार्थी निर्दोष सुटला नसून सर्वच्या सर्व दोषी आढळल्याचे मंडळाचे म्हणणे आहे. 
 
१९ पासून अर्ज, १२ जुलैपासून परीक्षा : अनुत्तीर्ण झालेल्या जुन्या-नव्या सर्व विद्यार्थ्यांना आगामी १९ जूनपासून पुढील परीक्षेचे अर्ज दाखल करता येतील. यावर्षीही पुरवणी परीक्षा १२ जुलैपासून घेतली जाईल. सर्व विद्यार्थ्यांचे मूळ गुणपत्रक आठवडाभरात प्राप्त होतील, असे मंडळाने कळवले आहे. 
 
 
मुलींची टक्केवारी ८.२८ ने अधिक : मुलींची उत्तीर्णतेची त्यांची टक्केवारी ८८.३९ असून, मुलांच्या तुलनेत ती ८.२८ टक्क्यांनी अधिक अाहे. १४ हजार ९७५ मुले प्रवीष्ठ झाली होती. त्यापैकी ११ हजार ९९६ उत्तीर्ण झाली. याऊलट १३ हजार ४३८ मुलींनी परीक्षेत प्रवीष्ठ होऊन ११ हजार ८७८ विद्यार्थीनींनी यश संपादन केले. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, तालुकानिहाय निकाल असा... 
बातम्या आणखी आहेत...