आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशोशिखर : दहावीच्या परीक्षेत बुलडाणा जिल्हा अव्वल, 35 हजार 972 विद्यार्थी झाले उत्तीर्ण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा येथील भारत विद्यालयात गुणवंतांचा सत्कार करताना मुख्याध्यापक उन्हाळे. - Divya Marathi
बुलडाणा येथील भारत विद्यालयात गुणवंतांचा सत्कार करताना मुख्याध्यापक उन्हाळे.
बुलडाणा - राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज १३ जून रोजी दुपारी१ वाजता आॅनलाईन घोषित करण्यात आला. या परीक्षेत बुलडाणा जिल्ह्याने अमरावती विभागातून प्रथम क्रमांक पटकावला असून त्याची टक्केवारी ८८.४९ एवढी आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी प्रमाणे यावर्षी देखील बुलडाणा जिल्ह्याने अव्वल क्रमांक प्राप्त केला आहे. तर त्या खालोखाल वाशीम जिल्ह्याने ८७.३७ टक्के घेवून अमरावती विभागात द्वितीय तर त्या खालोखाल अकोला ८४.०२ टक्के, अमरावती ८५.१५ टक्के तर यवतमाळ जिल्ह्याचा ७८.०३ टक्के निकाल लागला आहे. 
बुलडाणा जिल्ह्यातील ४० हजार ६५२ विद्यार्थ्यापैकी ३५ हजार ९७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये हजार ६०५ प्रावीण्य श्रेणीतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच जिल्ह्यातील ७३ शाळांचा शंभर टक्के निकाल लागला असून बुलडाणा येथील राजर्षी शाहू महाराज हायस्कूलचा निकाल शून्य टक्के लागला आहे. 

मार्च २०१७ मध्ये दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील ४९२ शाळांमधील ४० हजार ७९६ विद्यार्थ्यानी अर्ज भरले होते. त्यापैकी ४० हजार ६५२ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी ३५ हजार ९७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये १९ हजार ७४७ मुले १६ हजार २२५ मुलींचा समावेश आहे. त्यामध्ये मुलांची टक्केवारी ८६.४१ एवढी असून मुलीची टक्केवारी ९१.१६ एवढी आहे. गतवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा निकालात मुलींनी बाजी मारली आहे. या परिक्षेत जिल्ह्यातील हजार ६०५ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले असून प्रथम श्रेणीत १४ हजार ४५८ तर द्वितीय श्रेणीत १० हजार ९२० विद्यार्थी तर हजार ९८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची टक्केवारी पाहता जिल्ह्याने शिक्षणात चांगलीच भरारी घेतल्याचे दिसून येत आहे. तसेच जिल्ह्यातील शंभराहून अधिक शाळांचा ९० टक्क्याच्या वर निकाल लागला आहे. 
 
तालुकानिहाय निकालाची टक्केवारी : गतवर्षी प्रमाणे यावर्षीही सिंदखेडराजा तालुक्याने दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातून बाजी मारली असून या तालुक्याचा निकाल ९५.६४ टक्के लागला आहे. तर त्या खालोखाल बुलडाणा तालुका ९१.३१ टक्के, मोताळा ८७.८३, चिखली ९२.८५, देऊळगावराजा ९३.७८, लोणार ९१.२७, मेहकर ८८.७९, खामगाव ८४.८६, शेगाव ८०.२५, नांदुरा ८१.८४, मलकापूर ९०.९७, जळगाव जामोद ८२.१४ संग्रामपूर तालुक्याचा ८६.६५ टक्के निकाल लागला आहे. 
 
पुढील स्लाइडवरवाचा, जिल्ह्यातील शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळा...