आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाता २० जूनपासून मिळणार विद्यार्थ्यांना अकरावीचे प्रवेश अर्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - इयत्ता अकरावीचे प्रवेश अर्ज २० जूनपासून २४ जूनपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. शिवाजी महाविद्यालयात झालेल्या प्राचार्यांच्या बैठकीत अकरावीचे केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसंदर्भात चर्चा करून प्रवेशप्रक्रियेसंदर्भात निर्णय घेण्यात आला. 

अकरावी प्रवेशासाठी १४ अर्ज विक्री केंद्रे जाहीर केले आहेत. २० ते २४ जूनपर्यंत प्रवेश अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सकाळी ते दुपारी वाजेपर्यंत होणार आहे. प्रवेश प्रक्रिया कशा पद्धतीने राबवण्यात येईल, माहिती पत्रक कशा पद्धतीने राहील, आरक्षण, विशेष आरक्षण, प्रवेशासाठी गुणवत्ता , व्यवस्थापन कोटा, कॅम्पस कोटा (दहावी जर त्याच शाळेतून उत्तीर्ण केली असणारे विद्यार्थी) आदींबाबत प्रवेश समितीचे सचिव गजानन चौधरी यांनी सांगितले. प्रवेश प्रक्रियेसंबंधी प्रवेश अर्ज विक्री, स्वीकृती यादी, प्रकाशित करणे, प्रवेश घेणे, काही तक्रारी असल्यास त्या स्वीकारणे आदीबाबत चर्चा करण्यात आली. सर्व महाविद्यालयांमध्ये केंद्रीय पद्धतीने प्रवेश दिल्या जाील . कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, याबाबत पालकांनी निश्चित रहावे, असे आवाहन प्राचार्यांच्या समितीने केले आहे. बैठकीला शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, प्रवेश प्रक्रिया समितीचे कार्याध्यक्ष प्रा. अविनाश बोर्डे, प्राचार्य विजय नानोटी, उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे, देवेंद्र अवचार, शिक्षण उपनिरीक्षक आत्माराम राठोड, प्रा. प्रकाश डवले उपस्थित होते. 

प्रवेश केंद्राचे उद््घाटन 
केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबवताना मुख्य कार्यालयाची गरज लक्षात घेता आरएलटी विज्ञान महाविद्यालयात कार्यालये थाटण्यात आले. या कार्यालयाचे उद्घाटन शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, प्राचार्याच्या समितीचे अध्यक्ष प्राचार्य सुभाष भंडागे, कार्याध्यक्ष अविनाश बोर्डे, प्राचार्य विजय नानोटी, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड, सचिव गजानन चौधरी, प्रेमकुमार सानप, अत्रे पदाधिकारी उपस्थित होते. 

प्रॉस्पेक्ट्स येथे 
शिवाजी काॅलेज, आरएलटी, जागृती विद्यालय, महाराष्ट्र, मा. शाळा, ज्योती जानोरकर, कपिलवस्तू नगर, श्रीराम विद्यालय, नानासाहेब मोहोड कनिष्ठ काॅलेज, नाईक काॅलेज, आरडीजी काॅलेज, मांगीलाल शर्मा, भिकमचंद खंडेलवाल कनिष्ठ महाविद्यालय, डवले कनिष्ठ महाविद्यालय मोठी उमरी, आदर्श कनिष्ठ महाविद्यालय गुप्ते रोड, समर्थ कनिष्ठ महाविद्यालय, शहाबाबू महािवद्याल.
 
प्रवेश प्रक्रिया अशी 
२० ते २४ जून पर्यंत प्रवेश अर्ज विक्री स्वीकृती, २७ जून रोजी विलंब शुल्कासह प्रवेश अर्ज विक्री स्वीकृती, जुलै रोजी दुपारी वाजेपर्यंत विशेष राखीव संवर्गाची यादी प्रकाशन विद्यार्थी प्रवेश मुदत, जुलै रोजी तक्रार निवारण, १० जुलैला सकाळी ११ वाजता सर्वसाधारण विद्यार्थी प्रवेश यादी प्रकाशित, ११ ते १४ जुलै सर्वसाधारण यादीतील प्रवेशाची मुदत, ११ जुलै रोजी दुपारी ते पर्यंत तक्रार सादर करण्याची मुदत, १५ जुलै व्यवस्थापन कोटा अंतर्गत प्रवेश. 
 
बातम्या आणखी आहेत...