आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया; शिक्षण विभागाची तयारी पूर्ण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाने पूर्ण केली आहे. त्याबाबत शिक्षण संचालकांना पत्रही देण्यात आले. शिक्षण संचालक एन.के. जरग यांच्याशी शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी प्रवेश प्रक्रिया राबवण्यासंदर्भात अमरावती येथे चर्चाही केली आहे. आता शिक्षण संचालक यांच्या होकारावर विद्यार्थांचे भाग्य अवलंबून आहे. 
 
अकरावीला ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया असावी हा मुद्दा दिव्य मराठीने वारंवार लावून धरला आहे. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे पाहिजे, त्या कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीच्या विज्ञान शाखेत प्रवेश मिळावेत त्यांचा होणारा खर्च वाचावा, यासाठी शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी अकरावी प्रवेशासाठी अनुकूल भुमिका घेतली. अमरावती शहरात राबवण्यात येणाऱ्या पॅटर्ननुसार अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने करण्यासाठीची संपूर्ण तयारी शिक्षण विभागाने केली आहे. संस्था चालकांचे मन वळवण्यात शिक्षण विभागाला यश आले आहे. संपूर्ण केंद्रीय प्रक्रियेला सहकार्य करण्याचे आश्वासन शहरातील ५४ कनिष्ठ महाविद्यालयांनी दिलेे. आता तयारी जरी पूर्ण झाली असली, तरी शिक्षण संचालक पुणे, काय भूमिका घेतात. यावर सर्व अवलंबून आहे. 

पाच बैठकांनंतर समिती गठित 
ऑनलाइन प्रक्रिया राबवण्यासाठी शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी पाच बैठका घेतल्या. पहिल्या बैठकांना पाहिजे त्या प्रमाणात संस्थाचालकांनी सहकार्य केले नव्हते. मात्र,त्यांना अल्टिमेटम प्रक्रिया राबवायचीच आहे. असे बजावल्यानंतर प्रवेश प्रक्रियेसाठी समितीचे गठण करण्यात आले. त्यात सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा समावेश आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांनीही मानसिक तयारी केली आहे. 

सॉफ्टवेअर रेडी आहे 
^अमरावतीयेथील केंद्रीय पद्धत अकोल्यात राबवण्यासाठी अमरावतीचे सॉफ्टवेअर रेडी आहे. त्याचा अभ्यासही केला आहे. पाच-सहा दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. प्रक्रिया राबवण्यासाठी आम्ही तयार आहोत. संचालकांनी हिरवी झेंडी दिल्यास त्याच दिवशी ऑनलाईन प्रक्रियेला सुरुवात करणार आहोत. शहरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. -प्रकाशमुकुंद, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) 
 
बातम्या आणखी आहेत...