आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्चर्य: जिल्ह्यामधील 3 गावे झाली नकाशातून गायब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खामगाव - सातपुडापर्वताच्या मध्यात असलेली तीन गावे महाराष्ट्र-मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेली आहेत. परंतु ही तीन गावे महाराष्ट्रात असल्याची नोंद दस्तावेजात नाही. याबाबतचा खुलासा जिल्हा परिषदेच्या मानव विकास विभागाच्या अहवालात करण्यात आला आहे. यामध्ये १०० वर्षांपूर्वी वसलेले भिंगारा, चालीस टपरी गोमाल या तीन गावांचा सरकारी दप्तरी उल्लेख नाही. त्यामुळे या गावांचा विकास रखडला असून, गावात मूलभूत सुविधांचा बट्ट्याबोळ झाला आहे. विशेष म्हणजे या गावातील लोकांना गावाचा विकास काय असतो, हे अद्यापही दिसला नाही. 
 
देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षांचा कालावधी उलटला आहे. परंतु अनेक गावे महाराष्ट्रातील गावांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली नाही. या गावांमध्ये सातपुडा पर्वत रांगांत वसलेल्या तीन गावांचा समावेश आहे. याबाबतची माहिती जिल्हा परिषदेच्या मानव विकास विभागाच्या अहवालात उघड झाली. यामध्ये महाराष्ट्र-मध्य प्रदेशाच्या सीमेवर वसलेले भिंगारा, चालीस टपरी गोमाल या गावांचा उल्लेख करण्यात आला आहे. प्रगतशील महाराष्ट्र म्हणून डंका पिटणाऱ्या राज्याची प्रगती किती प्रमाणात झाली, हे उपरोक्त तीन गावांच्या उदाहरणावरून दिसून येत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या तिन्ही गावातील लोकांजवळ मतदान ओळखपत्र आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी नेते आपली पोळी भाजण्यासाठी या लोकांची मदत घेतात. परंतु निवडणूक होताच तेथील नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात येते. 
 
दरम्यान या लोकांना महाराष्ट्राचे नागरिकत्व अधिकार मिळवून देण्यासाठी नेत्यांकडून प्रयत्न करण्यात आले नाही. ही एक शोकांतिका आहे. बुलडाणा मध्य प्रदेशाच्या सीमेवर वसलेल्या चाळीस टपरी या गावात जाण्यासाठी ग्रामस्थांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. या गावात जाण्यासाठी रस्ता नाही. या मार्गात मोठ मोठे दगड आहे. या दगडांवरून पाय घसरून पडण्याची शक्यता आहे. 
 
ग्रामस्थांकडे मतदान कार्ड 
भिंगारा,चालीस टपरी गोमाल या तिन्ही गावातील लोकांजवळ मतदान कार्ड आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी नेते आपली पोळी भाजण्यासाठी या लोकांची मदत घेतात. परंतु निवडणूक झाल्यानंतर तेथील नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात येते. 
 
बालके शिक्षणापाासून वंचित 
मूलभूतसुविधांपासून वंचित असलेल्या या लोकांच्या जीवनावर विपरित परिणाम होत आहे. या गावातील बालके शिक्षणापासून वंचित आहेत. कोणत्याही प्रकारची आरोग्य सुविधा नाही. जर या गावातील एखादा व्यक्ती आजारी पडला तर देवच त्याला वाली अशी परिस्थिती आहे. या गावातील लोकांना सर्वत्र समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. 
 
समस्यांचे निराकरण करण्याची अपेक्षा : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांनी तयार केलेल्या अहवालात ही वस्तुस्थिती समोर आली आहे. आता काही समस्यांचे निराकरण होईल अशी अपेक्षा या गावातील नागरिकांची आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...