आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकाेला- दहा वर्षीय चिमुकलीवर सामूहिक बलात्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला- एका चिमुकलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना शनिवारी दुपारी टिळक राेडवरील एका वाणिज्य संकुलमध्ये घडली. ती इयत्ता पाचवीत शिकते. अत्याचाराची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्तस्त्राव झाल्याने चिमुकलीला सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात अाले अाहे. बलात्काराच्या घटनेत तीन नराधमांचा समावेश असल्याची शक्यता वर्तवण्यात येत अाहे. नराधमांनी चिमुकलीला मारहाण केल्याची माहिती आहे. 
 
रामदासपेठ पाेलिस स्टेशन अंतर्गत टिळक राेडवर त्रिवेणेश्वर काॅम्पलेक्स अाहे. यातील चौथ्या मजल्यावरून एक जवळपास १० वर्षांची चिमुकली दुपारी रडतच खाली अाली. या मुलीचा ड्रेस रक्ताने माखला हाेता. तिच्याकडे काॅम्पलेक्समधील व्यापारी हमालांचे लक्ष गेले. तिच्यासाेबत अनुचित प्रकार घडल्याचे त्यांच्या लक्षात अाले. व्यापाऱ्यांनी तिची अास्थेने चाैकशी करत घटनेची माहिती पाेलिसांना दिली. पाेलिसांनी तिला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात भरती केले पंचनामा केला. घटनास्थळाची पाेलिस अधीक्षक चंद्रकिशाेर मिणा, शहर पोलिस उपअधीक्षक उमेश माने, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे, रामदास पेठचे ठाणेदार प्रकाश सावकार यांनी पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाेलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु हाेती. 

नराधमांनी दुसऱ्या मार्गाने पलायन केले असावे: या काॅम्पलेक्समध्ये प्रवेश करण्यासाठी दाेन मार्ग अाहेत. पहिला टिळक मार्गावरील मुख्य तर दुसरा काॅम्प्लेक्सच्या उजव्या बाजूने जात असलेल्या रस्त्याकडून अाहे. या दुसऱ्या मार्गाने त्यांनी पळ काढला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत अाहे. तसेच त्यांना परिसराची संपूर्ण माहिती असल्याचा दावा करण्यात येत अाहे.  
अाजीचा धावा : चिमुकली रडतच काॅम्प्लेक्सच्या खाली अाली. तिची व्यापारी इतर नागरिकांनी अास्थेने विचारपूस केली. त्यानंतर तिला सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात अाले. या ठिकाणीही तिच्याकडून अापबिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात अाला. जखमांमुळे ती विव्हळत हाेती. ती सातत्याने अाजीचा धावा करत हाेती. 
 
अार्थिक परिस्थिती बेताची :प्राथमिक माहितीवरून चिमुकलीच्या घराची अार्थिक परिस्थिती बेताची असल्याचे समजते. ती परिसरात कचरा उचलण्याचे काम करायची असे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे अार्थिक चणचण भासत असलेली चिमुकली पैशांचे नाव काढताच तिसऱ्या मजल्यावर गेली असावी, अशी शक्यता अाहे. 
 
सीसीटिव्ही कॅमेरे नादुरुस्त ? 
काॅम्प्लेक्सच्या बाहेर असलेला एक सीसीटिव्ही कॅमेरा बंद असल्याचे एका युवकाने पाेलिसांना सांगितले. मात्र, काॅम्प्लेक्समधील एका दुकानात सीसीटिव्ही कॅमेरा अाहे. परंतु हा कॅमेरा केवळ या दुकानापुरताच मर्यादित असल्याने या सीसीिटव्ही कॅमेरा प्रणालीत बलात्काराशी संबंधित हालचाली कैद हाेणे शक्य नसल्याचे तज्ज्ञांचे मत अाहे. तरीही पाेलिस पडताळणी करत अाहेत.
 
बंद पडलेल्या वास्तुत घडली घटना : बलात्काराची घटना बंद पडलेल्या काॅम्प्लेक्समध्ये घडली. सुरक्षेबाबत खबरीदारी घेण्यात अालेली नाही. घटना घडलेल्या ठिकाणी शासकीय मुलांचे वसतिगृह हाेते. हे वसतिगृह काही दिवसांपूर्वी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत केले. वसतिगृहातील बंद पडलेल्या शाैचालय स्नानगृहाजवळ बलात्काराची घटना घडली. 
 
वाणिज्य संकुलांची सुरक्षा एेरणीवर : नियम धाब्यावर बसवूनच बहुतांश संकुले उभारली अाहेत. यामध्ये सुरक्षेबाबत खबरदारी घेण्यात येत नाही. काही संकुलांच्या एक-दाेन मजल्यांमधील दुकाने, हाॅल बंद असतात. येथे अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी घेण्यास काेणीच पुढाकार घेत नाही. त्यामुळे यानंतर ही शहरातील वाणिज्य संकुलांमधील सुरक्षेचे अाॅडिट करावे, अशी मागणी या घटनेच्या निमित्ताने पुढे अाली अाहे. 
 
चिमुकलीने केले वर्णन 
पाेलिस डाॅक्टरांनी चिमुकलीची अास्थेने विचारपूस केली. तिच्याकडून बलात्कार केलेल्या नराधमांचे वर्णन कसे हाेते, हे जाणून घेण्यात अाले. चिमुकलीने काेणी काेणत्या रंगाचे ड्रेस परिधान केले हाेते, हे सांगितले, असे सूत्रांचे म्हणणे अाहे. 
 
कट रचून बलात्कार केल्याचा संशय 
पिडीत चिमुकली जुने शहर परिसरात राहते. तिचे वडिल मजुरी करतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक ५० ते ५५ वयाचा इसम काॅम्प्लेक्सच्या बाहेर उभा हाेता. त्याने मुलीला तिसऱ्या मजल्यावर दाेन युवक असून, ते तुला पैसे देतात’, असे सांगितले. त्यामुळे ती तेथे गेली. याठिकाणी दुकाने नसल्याने वर्दळ नव्हती. दाेन युवकांनी तिच्यावर बलात्कार केला. 
बातम्या आणखी आहेत...