आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील 59 उमेदवार करोडपती; तर 54 जणांंची संपत्ती 50 लाखांच्या वर (महाकाैल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिका निवडणुकीत २० प्रभागातून ८० जागांसाठी ५७९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यापैकी ५९ उमेदवारांची स्वत:सह अवलंबिताची जंगम आणि स्थावर मालमत्ता कोटी ते १८ कोटी पर्यंत आहे. तर ५४ उमेदवारांची जंगम आणि स्थावर मालमत्ता ५० लाखांपेक्षा अधिक आहे. 
 
महापालिकेच्या निवडणुकीत भाजप, कॉग्रेस, सेना, भारिप-बमसं, राष्ट्रवादी कॉग्रेस, एमआयएम, रिपाइं, बहुजन समाज पक्ष, संभाजी बिग्रेड, बहुजन मुक्ती मोर्चा, समाजवादी पक्ष आदींसह अपक्षही मैदानात उतरले आहेत. नियमानुसार या उमेदवारांना स्वत:सह पती,पत्नी आणि अवलंबीतांची मिळुन जंगम तसेच स्थावर मालमत्तेची माहिती निवडणुक आयोगाला द्यावी लागते. त्यामुळे कोणत्या पक्षाचे किती उमेदवार कोट्यधीश तसेच लखपती आहेत, याची माहिती मिळते. या निवडणुकीत तर मतदान केंद्रांच्या बाहेर उमेदवारांची संपूर्ण माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे. यात त्याचे शिक्षण, संपत्ती, किती गुन्हे दाखल, कोणत्या स्वरुपाचे आदी पूर्ण माहितीचा समावेश आहे. 
 
या निवडणुकीत ५७९ उमेदवारांपैकी ५९ उमेदवार करोडपती आहेत. यात सर्वाधिक भारतीय जनता पक्षाचे असुन त्यांची संख्या १४ आहे. शिवसेनेचे १२, कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेस, अपक्ष प्रत्येकी ९, भारिप-बमसंचे ४, मनसे आणि संभाजी बिग्रेडचा प्रत्येकी असा समावेश आहे. तर ५४ उमेदवारांची जंगम आणि स्थावर मालमत्ता ५० लाखापेक्षा अधिक आहे. यात अपक्ष १९, भाजप, सेनेचे प्रत्येकी ९,राष्ट्रवादी कॉग्रेसचे ६, कॉग्रेस, भारिप-बमसंचे प्रत्येकी तर एमआयएमचा असा समावेश आहे. 
 
२४ जणांवर कर्ज 
एकीकडे ५९ उमेदवार करोडपती, ५४ उमेदवार लखपती असले तरी यापैकी काही जणांवर दायित्व सुद्धा आहे. २० किंवा त्यापेक्षा अधिक दायित्व, थकीत असलेल्या उमेदवारांची संख्या २४ आहे. 
बातम्या आणखी आहेत...