आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन ट्रकची समोरासमोर धडक; ठार, गंभीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोणगाव - भरधाव जाणाऱ्या दोन ट्रकची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज १५ जून रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास येथून दोन किलोमीटर अंतरावर घडली. दरम्यान या अपघातात दोन्ही ट्रक रस्त्यावर आडवे झाल्यामुळे महामार्गावरील वाहतुक काही काळ ठप्प पडली होती. 
चंद्रपूर वरून डब्ल्यू.बी. २३/ सि/ ४७४८ या क्रमांकाचा ट्रक लोखंड घेवून मुंबईकडे जात होता. तर एम.एच. १६/ बीसी/ ९७०१ या क्रमांकाचा ट्रक अहमदनगरवरून नागपूरकडे जात होता. मेहकर ते डोणगाव मार्गादरम्यान या दोन्ही ट्रकची समोरासमोर धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात दोन्ही ट्रक क्षतिग्रस्त होवून रस्त्यावर पलटी झाले. या अपघातात रवीकुमार सहा रा. छापरा, बिहार संभाजी सुदाम चतुर रा. अहमदनगर हे दोन जण जागीच ठार झाले आहेत. तर पंकज बाळासाहेब चतुर हा गंभीर जखमी झाला आहे. अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून गंभीर जखमीला औरंगाबाद येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे. अपघातग्रस्त दोन्ही ट्रक रस्त्यावर आडवे झाल्यामुळे नागपूर मुंबई महामार्गावरील वाहतुक तीन तास ठप्प पडली होती. यावेळी महामार्गाच्या दोन्ही बाजुला वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार आकाश शिंदे, वाहतुक पोलिस किशोर साळवे, पोहेकॉ शेख आसिफ, अरुण खनपटे, काळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.