आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नाफेड’च्या खरेदीमध्ये शेतकऱ्यांचे हाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेल्हारा - तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये सुरू असलेल्या नाफेडमार्फत तूर खरेदीबाबत शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्याावे लागत असून तूर खरेदीमध्ये होत असलेल्या भेद भावामुळे शेतकऱ्यांना कुणीच वाली नसल्याचे दिसून येत आहे. 
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डामध्ये नाफेडमार्फत जो तूर खरेदीचा व्यवहार सुरू आहे. त्यामध्ये प्रचंड घोळ शेतकऱ्यांप्रती भेदभाव होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. यावर्षी बळीराजाला तुरीचे उत्पन्न झाल्यामुळे नाफेडमार्फत देण्यात येत असलेल्या भावामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आपला माल मार्केट यार्ड मध्ये आणला असता. आवक वाढून जवळपास दहा हजार क्विंटलची खरेदी करण्यात आली. जागेअभावी गोडावून उपलब्ध नसल्याने नाफेडने तूर खरेदी बंद केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची हजारो क्विंटल तूर पडून होती. आठवडाभरापासून तूर खरेदी बंद असल्यामुळे २५ फेब्रुवारी राेजी मात्र अचानक शेतकऱ्यांना कुठलीच पूर्वसूचना देता तूर खरेदी करण्यात आली. शेतकऱ्यांना याची माहिती मिळताच ते तूर मार्केट यार्डात घेऊन आले. तेव्हा पुन्हा आता तूर खरेदी बंद झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी आणलेला माल परत घेऊन जाणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला असल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.त्यानंतर मात्र रात्री उशिरा तूर घेऊन शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले. तथापि, सकाळी काही हमाल तुरीच्या पोत्याची फेरबदल करत असल्याचे आढळून आल्याने पुन्हा वाद चिघळला होता. प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर मात्र हा वाद निवळला. 
 
नियोजनाच्या अभावामुळे शेतकऱ्यांच्या हातावर तुरी 
पिंजर - शेतमालालाभाव नाही. पीक होऊनही खर्च निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा स्थितीत नाफेड मार्फत तुरीची खरेदी सुरू झाल्याने बाजार दरापेक्षा ५०० ते १००० रुपयापर्यंत प्रतिकिलो दर जास्त दर मिळणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न झाला. तथापि नियोजनाअभावी शेतकऱ्यांच्या हातावर तुरीच दिल्या जाणार की काय अशी शंका निर्माण होत आहे. नाफेड मार्फत खरेदी होत असताना बाजार समिती खरेदी-विक्री संघाकडून शेतकऱ्यांसाठी काही चांगले करण्याची संधी असताना राजकीय हस्तक्षेपामुळे
इच्छाशक्तीअभावी शेतकऱ्यांना तूर खरेदी केंद्रावर चकरा माराव्या लागतात. 
 
तूर खरेदी तालुक्याच्या ठिकाणीच ठेवलेल्यामुळे शेतकऱ्यांना ५० किलोमीटरावरून किरायाच्या वाहनाने तूर खरेदी केंद्रावर आणावी लागते.हमालीचा इतर खर्च शेतकऱ्यांना द्यावा लागतो. यंदा तुरीची आवक झाल्याने बाजार समितीच्या आवारातच मालाची गंजी लावून राखणदारी करावी लागते. मालाची खरेदी लवकर होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना १५-१५ दिवस तालुक्याच्या बाजार समितीत माल घेऊन बसावे लागत आहे. एकतर मालाची ने-आण करण्याचा खर्च, शिवाय पंधरा दिवसांचा शेतकऱ्यांचा होणारा इतर खर्च यामुळे शेतकऱ्यांच्या हातावर शेवटी ..तुरी... मिळणार असल्याचे दिसते.तुरीची मोठ्या प्रमाणावर आवक झालेली असल्यामुळे स्थानिक बाजार समिती खरेदी-विक्री संघानेच यावर शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन तोडगा काढावा. या दोघांमध्ये एकवाक्यता नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शेतकऱ्यांसाठी वजन काट्याची संख्या वाढवणे, चाळणी खरेदी करून त्यांची, हमालांची संख्या वाढवणे या उपायांची गरज असतानाही त्याची पूर्तता होताना नाही. बाजार समितीच्या भोंगळ कारभाराने शेतकऱ्यांना त्याचा त्रास होत आहे. काहीजण आपले वजन वापरून नंबर लावता मागून येऊन मालाचे मोजमाप करून घेतात. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होत आहे.शेतकरी बाजार समितीकडून केवळ जागा घेतात नंतर पुन्हा माल उचलून खरेदी-विक्री संघाच्या हद्दीत त्यांना माल घेऊन जावा लागतो. रात्री चोरांपासून मालाचे रक्षण त्यांनाच करावे लागते. शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांना पारावार उरला नसल्यामुळे बाजार समितीकडून त्यांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी होत आहे. 

इशारा देण्यात आला 
नाफेडच्या खरेदीमध्ये सुरू असलेला भेदभाव होत असलेल्या घोळाबाबत शिवसेना भारिपकडून निवेदन घेण्यात आले होते. याची दखल घेत खरेदी पूर्ववत करण्यात आली असून कुठल्याच शेतकऱ्यांची लुबाडणूक होऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. 

बाजार समितीने पावले उचलण्याची गरज 
‘नाफेड’च्या खरेदीत होत आहे भेदभाव 

^तेल्हारा बाजार समितीच्या पदाधिकारी संचालकांकडून नाफेडच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून जवळच्या नातेवाईकांची तूर खरेदी केली जात आहे. त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना कोणी वाली नाही अशा शेतकऱ्यांना ताटकळत ठेवून भेदभाव करत सुटीच्या दिवसातही कोणतीच पूर्वसूचना देता माल खरेदी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.’’ विजयबोर्डे, शेतकरी, गाडेगाव 

गैरसमज झाल्यामुळे वाद उफाळला होता 
^यासंदर्भात शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार मी खरेदी केलेला माल ‘नाफेड’च्या खरेदी-विक्री केंद्रात आणला होता. मात्र, असे काहीही झालेले नसून, या संदर्भामध्ये काही शेतकऱ्यांचा गैरसमज झाल्यामुळे हा वाद उफाळला होता. परंतु जागेच्या कमतरते अभावी माल खरेदी केंद्राच्या बाहेर काढण्यात आलाहोता. ’’ पप्पू केला, व्यापारी कृ.उ.बा.स. तेल्हारा 

जागेची व्यवस्था झाली, खरेदी सुरु 
^मार्केटयार्डमध्ये टोकन नंबर नुसार शेतमालाची खरेदी सुरू असून जागेची पर्यायी व्यवस्था झाल्याने खरेदी सुरू करण्यात आली.त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाची सुरळीत खरेदी करण्यात येत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी काही तक्रार असल्यास बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याची आवश्यकता आहे.’’ सुरेशतराळे, सभापती कृ.उ.बा.स. तेल्हारा

जागेअभावी मार्केटमध्ये आम्ही खरेदी केलेला माल ठेवण्यास जागा उपलब्ध नसल्याने सदर घोळ होत असून कृषी उत्पन्न बाजार समितीने याबाबत त्वरीत पावले उचलून आम्हास मार्गदर्शन करावे, अशी विनंती निवेदनाद्धारे व्यापाऱ्यांनी केली आहे. तालुकाभरातून शेतकऱ्यांचा माल एकाच ठिकाणी विक्रीला येत असून तालुक्यात हिवरखेड, मालेगाव, आरसूळ येथे जागा उपलब्ध आहे. दरम्यान या ठिकाणी उपकेंद्र उघडून खरेदी केली तर शेतकऱ्यांना सोयीस्कर होईल आणि खरेदी होण्यास मदत होईल. 
 
बातम्या आणखी आहेत...