आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकीकडे घेतला कर्जमुक्तीचा ठराव अन् दुसरीकडे कृषी याेजना नामंजूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - केवळ साेपस्कार म्हणून कर्जमुक्तीसह शेतकऱ्यांसाठी ठराव घेणाऱ्या जिल्हा परिषदेतील सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर वचक नसल्याने कृषिविषयक याेजना नामंजूर करण्याची नामुष्की बुधवारी पदाधिकाऱ्यांवर सर्वसाधारण सभेत अाेढवली. त्यामुळे सन २०१६-१७ २०१७-१८ या वर्षाच्या याेजनांचे एकत्रित नियाेजन करण्याचा निर्णय घेण्यात अाला. कृषीसह इतरही विभागाच्या याेजना का रखडल्या, असा सवाल शिवसेना, काॅंग्रेस सदस्यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला. मात्र याेजना रखडल्याचे खापर सत्ताधारी भािरप-बमसंच्या सदस्यांनी अधिकाऱ्यांवर फाेडले. तसेच गतवर्षी प्रमाणे यंदा बियाणे वाटप याेजनेचे नियाेजन नाही, असेही अधिकाऱ्यांनी सभेत सांगितले, हे येथे उल्लेखनीय. 
 
जिल्हा परिषदेने सन २०१६-१७ मध्ये कृषि विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी ११ प्रकाराचे साहित्य वितरीत करण्यात येणार हाेता. मात्र याेजना राबवण्यात अाली नाही. त्यामुळे बुधवारी या याेजनेला मंजुरी मिळण्यासाठी सर्वसाधारण सभेत विषय मांडण्यात अाला. यावर विराेधक सदस्यांनी जाब विचारला. कृषि विकास अधिकारी हनुमंत ममदे यांनी डिसेंबर २०१६मध्ये लाभार्थींच्या खात्यात जमा करण्याचा शासनाने अादेश जारी केल्याचे सांगितले. मात्र प्रशासनाने चार महिने काेणत्याही लाभार्थींला पत्रव्यवहार का करण्यात अाला नाही, असा सवाल शवसेना सदस्य नितीन देशमुख यांनी उपस्थित केला. या याेजनेत प्रचंड घाेळ झाला असून, तेल्हारा तालुक्याच्या लाभार्थींचे सािहत्य मूिर्तजापूर तालुक्यात वितरीत करण्यात अाले, असे भािरप-बमसंचे सदस्य गाेपाल काेल्हे म्हणाले. अधिकाऱ्यांनी परस्पर साहित्य वितरित केल्याचा अाराेप भाजपचे सदस्य मनाेहर हरणे यांना केला. नावांची समितीने निवड केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. भाजपचे सदस्य रमण जैन यांनी साहित्य गेले कुठे, असा सवाल उपस्थित केला. यावर अधिकाऱ्यांनी चाैकशी करावी लागेल , असे सांगितले. कांॅग्रेस सदस्य हिंम्मतराव घाटाेळ यांनी मागील वर्षी अखर्चित राहिलेला निधी त्याच पंचायत समितीअंतर्गत खर्च करण्यात यावी, अशी मागणी केली. सदस्य बाळासाहेब बाेंद्रे यांनी बियाणे वितरण याेजनेबाबत प्रश्न विचारला.
 
मात्र यंदा बियाणे वितरणाची याेजना राबवण्यात येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या चर्चेत शिवसेनेचे महादेव गवळे, भाजपचे गजानन उंबरकार, भािरप-बमसंच्या शाेभा शेळके, सदस्य दमाेदर जगताप यांनी सहभाग घेतला. सभेला अध्यक्षा संध्या वाघाेडे, उपाध्यक्ष जमीर उल्ला खान, शिक्षण सभापती पुंडलीकराव अरबट, समाजकल्याण सभापती रेखा अंभारे, महिला बाल कल्याण सभापती देवकाबाई पाताेंड, मुख्य कार्यकारी अधिकारी राममूर्ति शंकर, अतििरक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा सचिव व्हि.के. खिल्लारे यांच्यासह विभागप्रमुख गट विकास अधिकारी उपस्थित हाेते. 

महिला बाल कल्याण अधिकाऱ्यांवर हाेणार कारवाई : महिलाबाल कल्याण विभागाच्या गलथान कारभारावर भािरप-बमसंच्या सदस्या शाेभा शेळके यांनी प्रश्न उपस्थित केले. अधिकारी याेजना राबवण्यात अपयशी ठरले असून, विभागात गेल्यानंतर अधिकारी ना व्यवस्थित मािहती देत ना सन्मानाने संवाद साधत. त्यामुळे अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली. शिवसेना सदस्या ज्याेत्सना चाेरे यांनीही १५ वर्षांत काेणत्या याेजना राबवल्या, असा प्रश्न उपस्थित हाेता. अखेर सीईअाेंनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे जाहीर केले. महिला बाल कल्याण अधिकारी एस.पी. साेनकुसरे सभागृहात हजर नव्हते. यावरही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. 

हे ठराव झाले मंजूर 
१)बुधवारच्या सर्वसाधारण सभेत २३ मार्च राेजी झालेल्या अर्थसंकल्पिय सभेचे इतिवृत्त मंजूर करण्यात अाले. 
२) तेल्हारा तालुक्यातील दुवानझरी उर्वरितपान. 

अशी अाहे यंदाची तरतूद 
शेतकऱ्यांसाठी ठराव 

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी शेतकरी जागर मंर्चातर्फे जि.प. अध्यक्ष संध्या वाघाेडे यांना निवेदन दिले. यावेळी मनाेज तायडे, प्रशांत गावडे, ज्ञानेश्वर गावंडे, विजय देशमुख, कृष्णा अंधारे, ज्ञानेश्वर सुलताने अादी उपस्थित हाेते. त्यानंतर या निवेदनानुसार बुधवारी भािरप-बमसंच्या सदस्या प्रतिभा अवचार यांनी ठराव मांडला. हा ठराव मंजूर करण्यात अाला. यावर ठराव अनेक घेतले जातात, मात्र त्याची अंमलबजावणी हाेत नाही, असा टाेला सदस्य नितीन देशमुख यांनी लगावला. 

या अार्थिक वर्षात कृषी विभागाअंतर्गत जवळपास ३५ याेजना राबवण्यात येणार अाहेत. यामध्ये शेतकऱ्यांना पीव्हीसी पाईप पुरवणे ( ४५ लाख), ताडपत्री देणे (४५ लाख), एचडीपीई पाईपचे वितरण करणे (४५ लाख), साेयाबीनसाठी ग्रेडर पुरवणे ( १० लाख), डवरे देणे ( १० लाख), ग्राईंडचे वितरण करणे (५ लाख), अाेपल वेल पंपाचे वाटप करणे (४५ लाख), बायाेगॅस सयंत्रासाठी सहाय्य करणे (५ लाख), सबमर्सीबल पंप पुरवण्यासाठी ४५ लाख रुपयांची तरतूद केली अाहे. अाता यंदा दाेन्ही वर्षांच्या याेजना राबवण्याचे नियाेजन करण्यात येणार अाहे. 
 
बातम्या आणखी आहेत...