आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्राच्या विकासासाठी सक्रिय हाेण्याची गरज : गुंजन गोळे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- युवतींनी स्वतःवर प्रेम करणे अावश्यक आहे. कोणी आपल्या पाठिवर थाप नाही मारली तर खचू नका, स्वतःच स्वतःला शाबासकी द्या पुढे चला. पैशांपेक्षा माणसांना जोडा राष्ट्र विकासात मोलाचा हातभार लावा, असे आवाहन अमरावती येथील सामाजिक कार्यकर्त्या गुंजन गोळे यांनी येथे केले. 
 
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेद्वारा आयोजित विद्यार्थिनी संसदेत वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. संसद कृषी विद्यापीठातील डॉ.ठाकरे सभागृहात आयोजित केली हाेती. उदघाटन कृषी अधिष्ठाता डॉ.विलास भाले होते. यावेळी मंचावर विदर्भ प्रांत उपाध्यक्ष प्रा.राजीव बोरकर, संपदा सोनटक्के, हर्षल अलकरी यांची उपस्थिती होती. 
 
गुंजन गाेळे यांनी यावेळी मुलींनी घरच्या गृहिणींची काळजी घेण्याची गरज व्यक्त केली. चर्चसत्रात अभाविप चे पश्चिम क्षेत्र संघटन मंत्री संजय पोचपोर यांनी संघटनेबाबतची माहिती दिली. त्यांच्या हस्ते ऋतुजा मायी, तेजस्विनी बडगुजर, रसिका कृतिका बोरकर यांना छात्र सन्मान पुरस्कार प्रदान केला. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मंजुश्री कुळकर्णी यांना गौरवले. यावेळी मंजुषा खर्चे यांनी अभाविप या संघटनेचा परिचय करुन दिला. संचलन स्नेहा बोंडे, कोमल वाघमारे, दीक्षा राठी यांनी केले.
 
 संसदेच्या यशस्वीतेसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सहमंत्री संपदा सोनटक्के, महानगर मंत्री हर्षल अलकरी, विद्यापीठ मंत्री विष्णू अवचार , वशिष्ट कात्रे, अक्षय जोशी, पल्लवी घोगरे, पल्लवी बोंद्रे, निलिमा काकड, मिनाक्षी सरोदे, आयुष शर्मा, यश कराळे, दिपाली आगरकर, महेश चेके, पायल फोकमारे, जीवन हागे, ऋषीकेश अंजनकर, अनंता निंबाळकर, पुष्कर देव, चिराग अग्रवाल, अक्षय राजपूत, अक्षय गोरले आदींनी परिश्रम घेतले. 
 
विविध विषयांवर मार्गदर्शन 
महिलांवरील अत्याचार प्रतिबंध या विषयावर अकोल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, महिलांवरील अत्याचाराला कारणीभूत घटक या विषयावर विधिज्ञ मनीषा कुलकर्णी, ‘मी स्वतःला कशी ओळखू’, या विषयावर डॉ.वंदना बागडी, ‘स्त्री सशक्तीकरण स्वावलंबन’, यावर प्रा.डॉ.सुभाष गवई यांनी मार्गदर्शन केले. 
 
अशीही सेवा : शासकीय नोकरी सोडून गाविलगड ढोलताश्यांच्या माध्यमातून निधी उभारत, वुमन फाउंडेशनच्या मदतीने ५२ एचआयव्ही ग्रस्तांना गुजंन गोळे यांनी दत्तक घेतले आहे.५५० आदिवासी मुलांचे पालन पोषण करत, अमरावती येथील मनोरुग्णांची सेवा करण्याचा ध्यास गुंजन गोळे यांनी घेतला आहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...