Home | Maharashtra | Vidarva | Akola | news about akola district gram panchayat result

अवघ्या अडीच तासांत लागला 246 ग्रामपंचायतींचा निकाल

प्रतिनिधी | Update - Oct 10, 2017, 11:30 AM IST

गेल्या महिनाभरापासून सुरु असलेली पायपीट, प्रसंगी वाट्याला आलेला मानापमान, सभा-मेळावे-रॅलींचा ताण अशा सर्व प्रकारच्या मेह

 • news about akola district gram panchayat result
  अकोला- गेल्या महिनाभरापासून सुरु असलेली पायपीट, प्रसंगी वाट्याला आलेला मानापमान, सभा-मेळावे-रॅलींचा ताण अशा सर्व प्रकारच्या मेहनतीचा निकाल आज, सोमवारी अवघ्या अडीच तासांत बाहेर पडला. यासोबतच जिल्ह्यातील २७२ सरपंच आणि २११८ सदस्यांच्या निवडीवरही शिक्कामोर्तब करण्यात आले.

  शनिवारी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची प्रत्यक्ष मतमोजणी सोमवारी सकाळी १० वाजता तालुक्याच्या ठिकाणी सुरु झाली. त्यानंतर अवघ्या अडीच तासांतच सर्व ठिकाणचे निकाल घोषित झाले. कागदपत्रांची पुर्तता आणि सचिवालयापासून ते एसडीओ कार्यालयापर्यंतच्या अहवालाला पुन्हा एक-दीड तास लागला. त्यामुळे दुपारी वाजता बहुतेक मतमोजणी केंद्रांचे कामकाज आटोपले होते. अकोला तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सदस्यपदांसाठीची मतमोजणी खदान परिसरातील धान्य गोदामात झाली.

  १६ सरपंच आणि ९५१ सदस्य बिनविरोध विजयी झाल्यामुळे जिल्ह्यात २४६ सरपंच आणि ११६७ सदस्यांचीच प्रत्यक्ष निवडणूक झाली. यासाठी शनिवारी ८०४ केंद्रांवरुन मतदान घेतले गेले. लाख २३ हजार ८९५ नागरिकांनी (७७.६४ टक्के) मतदानाचा हक्क बजावला होता. या सर्वांनी कुणाला कौल दिला, हे मतमोजणीअंती स्पष्ट झाले. निकालानंतर अनेकांनी विजयी जल्लोष केला. त्यामुळे कौलखेड मार्गावरील वाहतूक दुपारपर्यंत बंद करण्यात आली होती.

  बाळापूर तालुका आघाडीवर
  बाळापूरतालुक्यात २८ ग्रामपंचायतींची निवडणूक होती. संख्या कमी असल्याने या तालुक्याची मतमोजणी अवघ्या दीड तासांतच आटोपली. एसडीओ संजय खडसे यांनी केलेले नियोजन त्याठिकाणी कामी आले. अकोल्याचा एसडीओपदाचा प्रभारही त्यांच्याकडेच आहे. येथे मात्र त्या सूत्राचा आधार घेतला गेला नाही. त्यामुळे येथील निकाल जिल्ह्यात सर्वात उशीरा घोषित झाले.

  इव्हीएममधून पहिल्यांदाच बाहेर पडले सरपंच
  आतापर्यंत सरपंचांची निवड सदस्यांमधूनच केली जायची. त्यामुळे गावात ज्या व्यक्तीचे संख्याबळ जास्त, तीच व्यक्ती त्या ठिकाणचा प्रमुख व्हायची. या वेळी पहिल्यांदा सरपंचांची थेट निवडणूक घेण्यात आली. त्यामुळे सरपंचांची नावेही इव्हीएममधून प्रथमच बाहेर पडली.

  अकोल्यात दोन कक्षांमधून करण्यात आली मतमोजणी
  मतमोजणीसाठी अकोल्यात दोन कक्ष स्थापन करण्यात आले होते. प्रत्येक केंद्रात १०-१० टेबलांची व्यवस्था करण्यात आली होती. एका ग्रामपंचायतीत कमाल तीन मतदारसंघ (वार्ड) असल्यामुळे एकाचवेळी तीन गावांची मतमोजणी सुरु झाली. ती संपल्यानंतर त्याच टेबलांवर दुसऱ्या तीन गावांची मतमोजणी केली गेली.
  ईश्वर चिठ्ठीसाठी मुलगा शोधून आणा
  सोमवारी सरपंचपदासाठी ग्रामपंचायत सदस्यांसाठी सरकारी गोडावूनमध्ये मतमोजणी सुरु होती. यावेळी दोन उमेदवारांना समांतर मते मिळाली. ईश्वरचिठ्ठी काढण्यासाठी लहान मुलगा हजर नसल्याने एका निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने पोलिसांना मुलगा शोधून आणण्याचे सांगितले. मात्र हे काम आमचे नसल्याचे सांगितल्याने मुलाची शोधाशोध सुरु झाली.

  ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दोन सदस्यांना समांतर मते पडल्यास ईश्वरचिठ्ठीने उमेदवाराची निवड ठरते. अशावेळी चिठ्ठी काढण्यासाठी मुलाला उपस्थित ठेवण्याची जबाबदारी ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची असते. मात्र सोमवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मुलाला उपस्थित ठेवणे आवश्यक होते. एका उमेदवाराला समांतर मते मिळाल्याने लहान मुलगा नव्हता. तेव्हा मुलगा कोठून आणायचा असा पेच निर्माण झाल्यानंतर पोलिसांना मुलगा शोधून आणण्याचे सांगितल्यानंतर ते काम आमचे नव्हे असे सांगून अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली.

  मतदार नोंदणीबद्दल आज आयुक्त घेणार आढावा
  मतदार नोंदणीचा आढावा घेण्यासाठी १० ऑक्टोबरला विभागीय आयुक्त पीयुष सिंह जिल्हा कचेरीत बैठक घेणार आहेत.

Trending