आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाच्या फंडात पैसे; कर्मचाऱ्यांना वेतन नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- तिजोरीत ठणठणाट असताना वेतन देणे ही बाब वेगळी. मात्र खात्यात एक वेतन देण्यापेक्षा अधिक निधी असताना देखील महापालिका कर्मचाऱ्यांना अद्याप वेतन देण्यात आलेले नाही. चार महिन्याचे वेतन थकले असून विना वेतनाचा पाचवा महिना सुरु आहे. पैसे असताना वेतन का नाही? असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झाला असून कर्मचारी त्रस्त झाले आहेत. 
 
महापालिकेचे उत्पन्न कमी असल्याने कर्मचाऱ्यांना नियमित वेतन दिले जात नाही. मार्च, एप्रिल, मे आणि जुन महिन्याचे वेतन थकले आहे. यापूर्वी जकातीच्या वसुलीतून वेतन दिले जात असे. जकात नंतर एलबीटी लागु झाली. एलबीटी बंद झाल्या नंतर एलबीटीचे अनुदान दिले जात होते तर आता जीएसटीचे अनुदान महापालिकेला दिले जाणार आहे. या महिन्यात महापालिकेला थकीत एलबीटी अनुदान आणि जीएसटी अनुदान मिळाले. तर मालमत्ता कराची सर्व साधारणपणे दररोज दहा ते बारा लाख रुपये वसुली होते. एलबीटी आणि जीएसटी अनुदानाची रक्कम नऊ कोटीच्या वर मिळाल्याने कर्मचाऱ्यांचे एक महिन्याचे वेतन, सेवा निवृत्ती वेतन देणे सहज शक्य आहे. कारण महापालिकेला एक महिन्याचे वेतन आणि सेवा निवृत्ती वेतन देण्यासाठी सात कोटी रुपये खर्च येतो. तर अनुदानाची रक्कम नऊ कोटी आहे. त्यामुळे खात्यात पैसे उपलब्ध असताना तातडीने एक महिन्याचे वेतन प्रशासनाने का दिले नाही? असा यक्ष प्रश्न सर्व सामान्य कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. खात्यात पैसे असताना वेतन दिल्यामुळे कर्मचाऱ्यांनी खासगीत तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. 
 
सफाईकामगार सोडून वेतन?
दरम्यान प्रशासनाने सफाई कामगार सोडून इतर कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करावे, अशी सुचना लेखा विभागाला केली आहे. डुकरे पकडण्यात सफाई कामगार सहकार्य करीत नसल्याने बहुधा प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु वृत्त लिहे पर्यंत वेतन बँकेत जमा करण्यात आले नव्हते. तसेच कोणत्याही कारणामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवता येत नसल्याची चर्चा महापालिकेत या निमित्ताने सुरु आहे. 
बातम्या आणखी आहेत...