आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचा एल्गार; धरणे अांदाेलनाने वाजला बिगुल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - अकाेले करांना मूलभूत सुविधा पुरवण्यात अपयशी ठरलेल्या महापालिकेने केलेल्या अवाढव्य मालमत्ता कर विराेधात शुक्रवारी काँग्रेसने एल्गार पुकारला. सत्ताधारी प्रशासनाने घेतलेल्या ‘तुघलकी’ निर्णयाला विराेध करण्यासाठी काँग्रेसने धरणे देत अांदाेलनालाचा बिगुल फुंकला. 

दिवसेंदिवस हे अांदाेलन अाणखी तीव्र हाेणार असून, साेमवारी हाेणाऱ्या महासभेच्या निमित्ताने नागरिकांनी महापालिकेत धाव घेऊन सत्ताधारी प्रशासनाला जाब विचारावा, असे अावाहन नेत्यांनी केले. अांदाेलनाला सामान्य अकाेलेकरानेही पाठिंबा िदला हाेता. 
महापालिका क्षेत्रातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय प्रशासनाने यापूर्वी घेतला हाेता. मात्र मालमत्ता पूनर्मल्यांकनाबाबत मनपाकडे अनेकांनी तक्रारी केल्या. तसेच मालमत्तेच्या नाेंदणी संगणाकामध्ये करणेही आवश्यक हाेते. मात्र नाेंदी झाल्या नाहीत. त्यानंतर अमरावती येथील स्थापत्य कंपनीची नेमणूक करण्यात अाली. 

हे काम सध्या अंतीम टप्प्यात अाहे. विकास प्रशासकीय खर्चासाठी पैसा हवा, हे कारण पुढे करीत मालमत्ता कर वाढवण्याचा निर्णय साेमवार, एप्रिल १७ राेजी सर्वसाधारण सभेत घेतला हाेता. निवासी कर ८० टक्के तर वाणिज्य मालमत्तेसाठी १२५ टक्क्यांनी करमूल्यांकनाच्या ठरावाला सभेत मंजुरी देण्यात अाली हाेती. त्यानंतर हा कर ३० ते ६० टक्क्यांवर अाणण्यात अाला, असा दावा सत्ताधाऱ्यांतर्फे करण्यात अाला. 

महापालिकेजवळ असलेल्या टिळक पुतळ्याजवळ काॅंग्रेसतर्फे धरणे अांदाेलन करण्यात अाले. त्यानंतर महापौरांना निवेदन सादर करण्यात अाले. 

अांदाेलनात माजी अामदार लक्ष्मणराव तायडे, मदन भरगड, महानगराध्यक्ष बबन चाैधरी, नातिकाेउद्दिन खतीब, नगरसेवक साजिद खान, राजेश भारती, नगरसेवक पराग कांबळे, अाकाश कवडे, रमाकांत खेतान, राजेश पाटील, मनिष हिवराळे, अजहर इकबाल, निखिलेश दिवेकर, प्रकाश तायडे, दादाराव मते, महेश गणगणे, अाझाद खाद, सिमा ठाकरे, पुष्पा गुलवाडे, विभा राूत, राजेंद्र चित्तलांगे, अभिषेक भरगड, प्रदीप वखारिया, अनंत बगाडे, संजय मेश्रामकर, डाॅ. माेहन खरे, चंद्रकांत सावजी, राजाभाऊ देशमुख, सैय्यद शहजाद, जनार्दन बुटे, रवी शिंदे, माे. इरफान, माे. नाैशाद, राजेश मते, नागेश बागडे, हरिष कटािरया, माेईन खान हसन खान, मकसुद ठेकेदार, अविनाश देशमुख, िवजय शर्मा अादी सहभागी झाले हाेते. 
 
 
 
मनपा मालिकाच्या दुकान भाड्यांचे वर्गीकरण करण्यात येणार असून यासाठी प्रशासन भाजप लाेकप्रतिनिधींशी चर्चा करु, असे महापाैर विजय अग्रवाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. मालमत्ता करवाढीिवराेधात सर्वच स्तरावरुन राेष व्यक्त झाल्याने सत्ताधारी प्रशासनाला अाता अल्पशी का हाेईना पण उपरती झाली अाहे. त्यामुळे पुरेसा अभ्यास करताच सत्ताधारी प्रशासनाने करवाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी केली काय, असा सवाल अाता विराेधकांनांमधून उपस्थित करण्यात येत अाहे. दरम्यान हाेणाऱ्या सभेत गाेंधळ निर्माण हाेऊ नये म्हणून महापाैरांनी पत्रकार परिषद घेतल्याची चर्चा शहरात हाेती. 
 
यापूर्वी नागरिकांनी केलेल्या स्वमूल्यांकनाच्या अाधारे कर लावण्यात येत हाेता. कालांतराने अनेक जण त्याच ठिकाणी घर दुरुस्ती, खाेल्या वाढवत हाेते. मात्र त्यावर कर अाकारण्यात येत नव्हता. त्यामुळे अाता चटई क्षेत्राला कर अाकारण्यात येत अाहे. शासनाच्या याेजनांच्या फायदा मिळण्यासाठी शासनाकडे निधी जमा करावा लागणार असून, यासाठी महापािलकेचे उत्पन्न वाढणे अावश्यक अाहे. नागरिकांना काही प्रमाणात त्रास हाेईल, मात्र हा निर्णय विकासासाठीच घेण्यात अाल्याचा दावा महापाैर अग्रवाल यांनी केला. पत्रकार परिषदेला उपमहापाैर वैशाली शेळके, स्थायी समिती सभापती बाळ टाले, भाजपच्या ज्येष्ठ नगरसेिवका गितांजली शेगाेकार, राहुल देशमुख यांच्यासह अधिकारी उपस्थित हाेते. 

दाेन्हीवेळा भाजपनेच केली करवाढ : यापूर्वी दाेन वेळा भाजपच्या कार्यकाळातच मालमत्ता कर वाढवण्यात अाल्याचे महापाैरांनी सांगितले. अाता ३० ते ६० टक्केच कर वाढ केली असल्याचे ते म्हणाले. 

५०टक्के नागरिकांनाच दुप्पट कर : एखादा१००० स्कवेअर फूटच्या फ्लॅटच्या खरेदीमध्ये ५०० ते ६०० स्क्वेअर फूटाचाच उल्लेख असताे. त्यामुळे अाता चटई क्षेत्रावर कर अाकारण्यात येणार अाहे. वाढीव करवाढीचा समाजातील सर्वांवर एकसारखा बाेजा पडणार नाही. ५० टक्के नागरिकांनी दुप्पट अािण १० टक्के नागरिकांना पाऊण पट कराचा बाेजाल सहन करावा लागणार अाहे. 

७०काेटी मिळतील : मालमत्ताकर वाढल्याने महपाािलकेला ७० काेटी रुपयांचा महसूल मिळणार अाहे. अमृत याेजनेच्या लाभासाठी १७५ काेटी रुपये शासनाकडे जमा करावे लागणार अाहेे. वाणिज्य संकुले असून, फुटानुसार भाडे अाकारण्यात येते. अाता रेडीरेकरच्या दरानुसार भाडे कर अाकारण्यात येणार अाहे. तसेच भाडे अाकारताना कराचे ए,बी.सी.असे वर्गीकरण करण्यात येईल. यासाठी रेडी रेकनर दराचा विचार केला जाईल. यापूर्वी स्वनिधीतून वेतन इतर बाबींना खर्चही भागत नव्हता, असेही महापाैरांनी स्पष्ट केले. 

व्यापाऱ्यांपुढे संकट 
^करवाढीचा सामना करणे छाेट्या व्यावसािंयकांना शक्य नाही. अाधीच व्यवसाय परवडत असून, करवाढीमुळे तर छाेट्या व्यावसाियकांचे कंबरडे माेडणार अाहे. परिणामी व्यावसाियकांच्या डाेक्यावरील कर्जाचा डाेंगरही वाढणार अाहे. त्यामुळे करवाढीच्या निर्णयाचा निषेध करावी तेवढा कमीच अाहे.’’ -रमाकांत खेतान, नेते, काॅंग्रेस. 

नेत्यांचे अपयश 
^विकासासाठी पुरेसािनधी खेचून अाणणे हे भाजपचे खासदार, अामदारांचे अपयश अाहे. नागरिकांच्या घमाचा पैसा कंत्राटदारांच्या घशात घालण्याचे काम सत्ताधारी करीत अाहेत. करवाढीिवराेधातील या अांदाेलन अकाेलेकरांनी सहभागी हाेऊन मनपाच्या दादागिरीला उत्तर द्यावे.’’ -मदनभरगड, महाचिव, प्रदेश काॅंग्रेस. 

घामाच्या पैशांची लुट 
^भरमसाठ मालमत्ताकर वाढ करुन महापािलका सत्ताधारी सामान्यांच्या घामाच्या पैशांची लुट करीत अाहे. भाजप सरकार हे अकाेलेकरांने रक्त पिणारे सरकार अाहे. चुकीच्या धाेरणांमुळे शेतकरी अात्महत्या करीत असून, तरीही सरकाला जाग अालेली नाही. मूलभूत सुिवधा नसतानाही कर वाढ का केलीे.’’ -साजिद खान पठाण, विराेधी पक्ष नेते. 

काँग्रेसने लुटले नाही 
^भाजप विकासा साठी निधीची गरज असल्याने करवाढ केल्याचा कांगावा करीत अाहे. सध्या रस्त्यांसह इतरही सुरु असलेल्या विकास कामांसाठीचा निधी काॅंग्रेसच्या कार्यकाळात खेचून अाणण्यात अाला. विकासासाठी काॅंग्रसने भाजपसारखा कधीही सामान्यांच्या खिसावर डल्ला मारला नाही.’’ राजेशभारती, महासचिव, महानगर, काॅंग्रेस 

काँग्रेस उत्तर देईल 
^मालमत्ताकरात प्रचंड वाढ करुन भाजपने सामान्यांना लुटण्याचा प्रयत्न केला अाहे. ही मतदारांची फसवणूक अाहे. कर वाढीबाबत नागरिकांना अालेल्या नाेटीसला काॅंग्रेसतर्फे उत्तर देण्यात येईल. यासाठी नागरिकांनी परिसरातील काॅंग्रेस नेत्यांशी संपर्क साधावा. भविष्यात हे अांदाेलन अाणखी तीव्र करण्यात येईल.’’ -प्रकाश तायडे, महासचिव, काॅंग्रेस 

हा तर शुभसंकेत 
दुपारी वाजता धरणे अांदाेलनाला सुरुवात झाली. अर्ध्याअधिक मंडपात ऊन अाली. मात्र तरीही काॅंग्रेस नेत्यांनी अांदाेलन सुरुच ठेवले. काही वेळाने ढगाळ वातारण निर्माण झाले. वातावरणात गारवा निर्माण झाला. त्यावेळी निखिलेश दिवेकर मनाेगत व्यक्त करीत हाेते. वातावरणातील अचानक झालेले बदल हे शुभसंकेत असून, या अांदाेलनाला जणू निसर्गही साथ देत अाहे, असेही दिवेकर म्हणाले. 

खुर्चीवर ठेवले निवेदन 
मालमत्ता करवाढी विराेधात कांॅग्रेसतर्फे एक शिष्ट मंडळ महापाैर विजय अग्रवाल यांना निवेदन देण्यासाठी गेले. मात्र हे शिष्टमंडळ पाेहाेचण्याच्या मिनिटांपूर्वीच महापाैरांनी कक्षातून गेले. त्यामुळे काॅंग्रेस नेत्यांनी कक्षात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांना सुरक्षा रक्षकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र या सुरक्षा रक्षकांना जुमानता नेत्यांनी अातमध्ये प्रवेश करीत खुर्चीवर निवेदन ठेवले. काॅग्रेसच्या नेत्यांनी घाेषणाबाजीही केली. 

फ्लेक्स ठरला लक्षवेधी 
मालमत्ता करवाढीिवराेधात झालेल्या अांदाेलनाची काॅंग्रेसने जय्यत तयारी केली हाेती. या ठिकाणी फ्लेक्सही लावण्यात अाले हाेते. या फ्लेक्सवर काॅंग्रेसचे झेंडे लावण्यात अाले. एकिकडे टॅक्सच्या अाेझ्याखाली सामान्य अकाेलेकराचे कसे कंबरडे माेडत अाहे दाखवण्यात अाले असून, दुसरीकडे टॅक्स वाढ केल्याने सत्ताधारी गब्बर हाेत असल्याचे दर्शवण्याचा प्रयत्न करण्यात अाला. या करवाढीचा निषेधही करण्यात अाला. 

दाेन प्रकाराच्या नाेटीस देऊ 
मालमत्ता करवाढीबाबत नागरिकांनी यानंतर दाेन स्वरुपाच्या नाेटीस देण्यात येणार अाहे. यामध्ये प्रथम अाक्षेपाबाबतची नाेटीस देण्यात येईल अािण दुसऱ्या नाेटीसमध्ये मालमत्तेबाबतच्या विश्लेषणाची मािहती असेल. मालमत्ता कर वाढीबाबत पूर्व झाेनमधून हजार अाक्षेप अालेले अाहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...