आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेची निवडणुक होऊन चार महिने; नगरसेवक करताहेत मानधनाची विचारणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेची निवडणुक होऊन चार महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र अद्यापही नवनियुक्त नगरसेवकांना मानधन मिळालेले नाही. त्यामुळे प्रथमच निवडुन आलेले नगरसेवक मानधन मिळाल्याबाबत आश्चर्य व्यक्त करीत असून मानधन केव्हा मिळणार हो, मानधन? असा प्रश्न संंबंधित कर्मचाऱ्यांना करीत आहेत. 
 
महापालिकेतील नगरसेवकांना दरमहा ७५०० इतके तटपुंजे मानधन दिले जाते. हे मानधनही दरमहा दिले जात नाही. नगरसेवकांना पैशाची काय गरज? या हेतुनेच मानधन खऱ्या अर्थाने रखडले जाते.
 
मात्र महापालिकेत कार्यरत राज्य शासनाचे अधिकारी मात्र नियमितपणे वेतन घेतात. नगरसेवकांना सहा ते सात महिने मानधन मिळण्यासाठी वाट पाहावी लागते. एखाद्या महिन्यात एकाच वेळी दोन महिन्याचे मानधन दिले जाते. मागील कार्यकारीणीत निवडुन आलेल्या नगरसेवकांचे ऑगस्ट २०१६ ते फेब्रुवारी २०१७ असे सात महिन्याचे मानधन रखडलेले आहे. जे निवडुन आले नाहीत, त्यांनाही मानधन देण्याची व्यवस्था महापालिकेने केली नाही. तर जे या निवडणुकीत निवडुन आले, त्या नगरसेवकांना चार महिन्यापासून मानधन मिळालेले नाही. एकीकडे नियमित करावा लागणारा खर्च, घरी समस्या घेऊन आलेल्या नागरिकाला चहापाणी या सर्व प्रकारामुळे प्रथमच निवडुन आलेले नगरसेवक वैतागले आहेत. मात्र पुन्हा निवडुन आलेल्या नगरसेवकांना मानधन उशिराने मिळण्याची सवय पडली आहे. त्यामुळे पुन्हा निवडुन आलेले नगरसेवक ‘इथे असेच आहे’ असे सांगून प्रथमच निवडुन आलेल्या नगरसेवकांना समजवण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

सुरक्षा रक्षकापेक्षाही कमी मानधन : महापालिकेतमानसेवी म्हणुन कार्यरत सुरक्षा रक्षकांना दहा हजार रुपये मानधन दिले जाते. तर नगरेसवकांना साडेसात हजार रुपये. त्यामुळे सुरक्षा रक्षकांपेक्षाही कमी मानधन नगरसेवकांना दिले जात असल्याची खंत काही नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. 
बातम्या आणखी आहेत...