आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कामबंद’चा तिढा सुटण्याची शक्यता, पालकमंत्र्यांसह आमदार बाजोरिया घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- मागील१४ दिवसांपासून थकित वेतनासाठी सुरू असलेल्या कामबंद आंदोलनाचा तिढा मंगळवारी रात्री सुटण्याची शक्यता आहे. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार गोपीकिशन बाजोरिया हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून, १३ व्या वित्त आयोगाच्या निधीतून वेतन देण्याबाबतची विशेष परवानगी घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे बुधवारपासून महापालिकेचे कामकाज सुरळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

२५ मेपासून थकित वेतनाच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी महापालिका कर्मचारी संघर्ष समितीने कामबंद आंदोलन सुरू केले. या १४ दिवसांच्या कालावधीत पदाधिकारी तसेच प्रशासनाने संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांशी अनेकदा चर्चा केली. परंतु, तोडगा निघू शकला नाही. जून रोजी आयुक्त अजय लहाने यांनी पुन्हा चर्चा केली. या चर्चेत एअरटेल कंपनीकडून प्राप्त झालेल्या चार कोटी २० लाख रुपयांच्या महसुलातून एक महिन्याचे वेतन तसेच एस्क्रो खात्यातील जमा असलेली रक्कम खर्च करण्याची परवानगी मिळाल्यास पुन्हा एक महिन्याचे वेतन देण्याचे आश्वासन दिले. परंतु, कर्मचारी चार महिन्यांचे थकित वेतन एकत्र देण्यावर ठाम राहिले. त्यामुळे ही चर्चा निष्फळ ठरली. यादरम्यान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनीही तोडगा काढण्याबाबत आयुक्तांसह मुंबई गाठली. जूनला एस्क्रो खात्यातील पाच कोटी ८० लाख रुपये वेतनासाठी खर्च करण्याच्या फाइलला गती मिळाली असून, ही रक्कम वेतनासाठी खर्च करण्याची शासनाने तत्त्वत: मंजुरी दिल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे एअरटेलकडून मिळणारे चार कोटी २० लाख, एलबीटीचे तीन कोटी ६३ लाख उर्वरीतपान
पाचव्या वेतनाची अट अमान्य
मंगळवारीदिवसभर झालेल्या चर्चेत १३ व्या वित्त आयोगातून केवळ वेतन देण्याची परवानगी मिळेल. यातून पाचव्या वेतनाची थकित रक्कम मिळणार नाही. ही रक्कम महापालिकेने स्वत:च्या निधीतून द्यावी, अशी बाब शासनाने स्पष्ट केल्याची माहिती आहे. तसेच कर्मचाऱ्यांनीही जास्त ताणून धरता सहकार्य करावे, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.
बातम्या आणखी आहेत...