आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापालिकेत चोर सोडून संन्याशाला दिली जाते फाशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- दिव्य मराठीने जुलैला प्रशासन विभागातील कामकाजाचे वाभाडे काढणारे ‘महापालिकेची फसवणूक करा आणि नोकरी परत मिळवा’ या आशयाचे वृत्त प्रकाशित केले. या वृत्तामुळे प्रशासन विभागात एकच खळबळ उडाली आहे. परंतु, या चुकीकडे डोळेझाक करीत अधिकाऱ्यांनी प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांनाच धारेवर धरले. ही माहिती लिक कशी झाली, असा जाबही कर्मचाऱ्यांना विचारण्यात आला. हा प्रकार म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखाच आहे, अशी चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे. तर, दुसरीकडे कर्मचाऱ्यांमध्ये नाहक मानसिक दडपण आले आहे.

एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची चुकीच्या पद्धतीने नियुक्ती करण्यात आली. या आशयाचे वृत्त दिव्य मराठीने प्रकाशित केले. संबंधित कर्मचाऱ्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तसेच बनावट प्रमाणपत्र दाखल केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार त्याच वेळी दाखल करण्यात आली आहे.परंतु, अद्याप याबाबत पोलिसांनी कोणतीच कारवाई केलेली नाही. त्यामुळेच न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून त्यांना सेवेत रुजू करून घेतल्याची चर्चा अधिकाऱ्यांच्या मार्फत महापालिकेत सुरू होती. परंतु, या सर्व बाबी सेवेत दाखल करून घेण्याच्या आदेशात स्पष्ट करणे गरजेचे होते. आदेशात या सर्व बाबींचा उल्लेख झाला असता तर हे वृत्तच प्रकाशित झाले नसते. परंतु, या सर्व चुकांकडे दुर्लक्ष करून टार्गेट मात्र सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना केल्या गेले. या प्रकारामुळे कर्मचारी धास्तावले आहेत.
बातम्या आणखी आहेत...