आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आज मनपाची सर्वसाधारण सभा, १२ कोटींच्या कामाकडे पदाधिकाऱ्यांची डोळेझाक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- पाणीपुरवठा विभागातील ११ कोटी ८४ लाख रुपयांच्या कामाबाबत कार्यकारी अभियंत्यांनी चक्क स्थायी समितीत काम चांगल्या दर्जाचे झाले नसल्याची कबुली दिल्यानंतरही पदाधिकाऱ्यांनी या कामाकडे डोळेझाक केली आहे, तर दुसरीकडे विरोधकही मुग गिळून बसले आहेत. त्यामुळे ११ कोटी ८४ लाख रुपयांच्या निधीत सुरू असलेल्या सैराट कारभाराला रोखणार कोण? अशी चर्चा महापालिका परिसरात सुरू आहे.

११ कोटी ८४ लाख रुपयांतून पाणीपुरवठा विभागातील विविध कामे केली जाणार आहेत. यात जलकुंभांना भिंत बांधण्यापासून ते जलशुद्धीकरण केंद्र परिसरात रस्ता तसेच भिंतीला प्लॉस्टरच्या कामांचा समावेश आहे. हे काम देताना कंत्राटदारासोबत केलेल्या करारनाम्यात विहित मुदतीत काम झाल्यास केवळ ५०० रुपये प्रतिदिन दंड आकारण्यात आला होता. दिव्य मराठीने या प्रकाराला वाचा फोडल्यानंतर संबंधित कंत्राटदाराला केवळ दोन हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. या योजनेतील कामाबाबत सातत्याने वार्तांकन केल्यानंतर स्थायी समिती सदस्यांनी हा विषय स्थायी समितीत घेण्याची मागणी सभापती विजय अग्रवाल यांच्याकडे केली. स्थायी समितीच्या सभेत कार्यकारी अभियंत्यांनी या योजनेतील कामे चुकीच्या पद्धतीने झाल्याची स्पष्ट कबुली दिली. त्यामुळे या योजनेच्या कामात घोळ झाला आहे, ही बाब सिद्ध झाली. सभापती विजय अग्रवाल यांनी ११ कोटी ८४ लाख रुपयांच्या कामाबाबत केलेला करारनामा, झालेली कामे, राहिलेली कामे आदी सविस्तर माहिती पुढील सभेत सादर करण्याची सूचना केली होती. ही सूचना करून आज महिना होत आला आहे. कार्यकारी अभियंत्यांनी काम चुकीच्या पद्धतीने झाल्याची कबुली दिल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी चुप्पी साधल्याने महापालिकेत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

विरोधकही मुग गिळून :
एकीकडेप्रशासन स्वत:च्या मर्जीने काम करत आहे, तर सत्ताधारी हतबल तसेच सुस्त झाले आहेत, तर दुसरीकडे विरोधकही मुग गिळून बसले आहेत. जाब विचारायलाच कोणी नसल्याने या सर्व प्रकारामुळे परिणामी ११ कोटी ८४ लाख रुपयाच्या सुरू असलेल्या सैराट कारभाराला रोखणार कोण? अशी चर्चा या निमित्ताने सुरू आहे.

रमाईयोजनेबाबतही मौन : रमाईघरकुल योजनेत नियमाचा फायदा घेत लाखो रुपयांची उधळपट्टी सुरू आहे. रमाई घरकुल योजनेतून कार्यालयीन कामकाजासाठी खरेदी केलेले साहित्य प्रत्यक्षात बांधकाम विभागात आहे की नाही? याची खातरजमा करण्याची तसदीही सत्ताधारी अथवा विरोधकांनी घेतलेली नाही. त्यामुळे या योजनेबाबतही सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी मौन बाळगले आहे. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मनपाचे होतेय नुकसान
संबंधितकामाची मुदत २८ जुलैला संपली. त्यानंतर कंपनीला केवळ दोन हजार रुपये प्रतिदिन दंड आकारल्या जात आहे. इतर कंत्राटदारांप्रमाणे या कंत्राटदाराला १० ते २० हजार प्रतिदिन दंड आकारला असता, तर मनपाला आर्थिक फायदा झाला असता. परंतु, कमी दंड आकारल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे.

आज मनपाची सर्वसाधारण सभा, विविध विषयांवर चर्चा
महापालिकेचीसर्व साधारण सभा शुक्रवार, १९ ऑगस्टला दुपारी दोन वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात होत आहे. सभेत एकूण पाच महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. ही सभा नेहमीप्रमाणे गदारोळात पार पडणार की शांततेत? याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

ही महासभा यापूर्वीच आयोजित केली होती. विषय पत्रिका निश्चित केली होती. परंतु, आयुक्त दौऱ्यावर गेल्याने ही सभा पुढे ढकलली. त्यामुळे आता या सभेचे आयोजन केले आहे. सभेत शासनाकडून नागरी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत मिळालेल्या दहा कोटी रुपयांतून विविध विकासकामे करण्याबाबत चर्चा केली जाणार आहे. तर कचरा संकलन करणाऱ्या घंटा गाड्यांबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. त्याच बरोबर १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून रोड स्विपर मशीन, कॉम्पॅक्टर खरेदी करणे, हुतात्मा स्मारक येथे शहिदांच्या स्मृतीप्रित्यर्थ अखंड अमर ज्योत लावणे बाबत चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. महापौरांच्या परवानगीने वेळेवर येणाऱ्या विषयांवर चर्चा होईल.
कचरा घंटागाडीबाबत वाद होण्याची शक्यता
घरोघरी जाऊन कचरा संकलन करणाऱ्या घंटा गाडीला नागरिकांकडून थेट शुल्क वसूल करण्याची परवानगी देण्याच्या बाजूने प्रशासन आहे, तर दर महिन्याला नागरिकांकडून कचरा संकलनासाठी शुल्क आकारता हे शुल्क मालमत्ता करात आकारून वसूल करावे, या बाजूने पदाधिकारी आहेत. त्यामुळेच या विषयावर आज होणाऱ्या महासभेत पुन्हा नव्याने चर्चा केली जाणार आहे. यापूर्वीच महासभेने आपला निर्णय दिल्यानंतर प्रशासनाकडून मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे या विषयावर पुन्हा वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बातम्या आणखी आहेत...