आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हद्दवाढीनंतर वार्षिक दरडोई उत्पन्नात अाता ४३७.३७ रुपयाने झाली घट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- महापालिकेची हद्दवाढ झाल्यानंतर उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. कदाचित ही वाढ होईल. परंतु, तूर्तास प्रत्यक्षात हद्दवाढीनंतर वार्षिक दरडोई उत्पन्नात ४३७.३७ रुपयाने घट झाली आहे. हद्दवाढी पूर्वी २०१४-२०१५ नुसार महापालिका क्षेत्राचे वार्षिक दरडोई उत्पन्न २४८२.२० होते. आता महापालिकेचे आणि समाविष्ट झालेल्या ग्राम पंचायतीचे एकूण उत्पन्न लक्षात घेता वार्षिक दरडोई उत्पन्न हे २०४४.८३ झाले आहे.

२००१ ला अस्तित्वात आलेल्या महापालिकेचे क्षेत्रफळ केवळ २८ चौरस किलोमीटर होते. महापालिका अस्तित्वात आल्यापासूनच हद्दवाढी प्रश्न प्रलंबित होता. २००१ च्या जनगणनेनुसार महापालिका क्षेत्रफळाची लोकसंख्या चार लाख ५२० होती तर २०११ च्या जनगणनेनुसार चार लाख २५ हजार ८१७ आहे. महापालिकेचे एकुण उत्पन्न १०५ कोटी ७० लाख रुपये आहे. महापालिकेचे क्षेत्रफळ कमी असल्यानेच महापालिका क्षेत्रालगतच्या गावांमध्ये नागरी वस्त्या वाढल्या. याचा परिणाम महापालिकेवर झाला. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून हद्दवाढी बाबत पुन्हा नव्याने चर्चा सुरु झाली. शासनाने स्वत:पुढाकार घेतल्याने या कामाने गती घेतली आणि अखेर महापालिकेची हद्दवाढ झाली. २८ चौरस किलोमीटर असलेले क्षेत्रफळ आता १२४.२२ चौरस किलोमीटर झाले. महापालिका क्षेत्रालगतची २४ गावे महापालिकेत समाविष्ट झाली. या २४ गावांचे एकुण उत्पन्न चार कोटी १४ लाख रुपये आहे. विद्यमान परिस्थितीत महापालिकेचे आणि समाविष्ट झालेल्या गावांचे एकुण उत्पन्न १०९ कोटी ८४ लाख रुपये झाले आहे.

अद्याप हद्दवाढी नंतरचे सर्व सोपस्कार पूर्ण झालेले नाही. हे सोपस्कार पूर्ण होण्यास सहा ते आठ महिने लागू शकतात. त्यामुळेच हद्दवाढी नंतर खऱ्या अर्थाने महापालिकेच्या उत्पन्नात २०१७-२०१८ या आर्थिक वर्षाातच वाढ होणार आहे. यामुळेच किमान वर्षभर महापालिका क्षेत्राचे दरडोई उत्पन्न हे कमी राहणार आहे. तर समाविष्ट झालेल्या भागाला मुलभूत सोयी सुविधा पुरवण्याची लिलया जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. त्यामुळेच या उत्पन्नात वाढ करण्यासाठी महापालिकेला विविध उपाय योजना कराव्या लागणार आहेत.

येथे हाेईल माेठी चढाअाेढ
मलाकापूर ग्रामपंचायतचा मनपा हद्दित समावेश केला अाहे. ग्रामपंचायतचे सुमारे सव्वा कोटीचे बजेट हाेते. अनेक बिल्डरांनी मलकापूर ग्रामपंचायत हद्दित सदनिका बांधल्या असून, सध्याही सुरु अाहेत. या सर्वांमधून ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होतो. मलकापूरला राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठा प्राप्त झाली अाहे. अंतर्गत राजकारणातून २३ अाॅगस्ट २०१३ राेजी तत्कालीन सरपंच सिद्धेश्वर देशमुख यांची गाेळ्या झाडून हत्या करण्यात अाली हाेती. जलस्वराज्य योजनेतील पाईप लाईन टाकण्यावरुन २४ एप्रिल २०१३ रोजी मलकापूर येथे वाद झाला हाेता. मासिक सेभेतच एका सदस्याला मारहाण केली हाेती. त्यानंतर हे हत्याकांड घडले हाेते. त्यामुळे अाता या मलकापूरमधून काेणते नगरसेवक मनपात जातात नंतर राजकरण कसे रंगते, याकडे सर्वांचे लक्ष लागले अाहे.

(टिप -शिलोडागावात नायगाव, भौरदमध्ये तपलाबाद- निजामपूर- अकोला- सुकापूर- अक्कलकोट- शहानवाजपूर, खरप बुद्रूकमध्ये उमरी प्र. अकोला-उमरखेड, अकोली खुर्द मध्ये अकोली बु या गावांचा समावेश आहे. )

ग्राम पंचाय उत्पन्न (लाखात)दरडोई(रुपयात)
शिलोडा२०.३५ ३०३.००
डाबकी ५.७० ४६६.४०
टाकळी जलम ००.७१ १४०.०९
भौरद ७१.०७ ५२६.२०
हिंगणा १०.३३ ७५९.९०
खरप बु ९.७७ ९०.८७
गुडधी ३१.५१ ६४२.५०
सोमठाणा ६.८० ७४०.९०
शिवापूर १.१९ ११२.१०
अकोली खु ११.२७ ५१०.२०
उमरी प्र २४.३६ १२०.३०
शिवर २.६५ ४३.९१
शिवणी २६.९९ १२०.३०
मलकापूर १०४.४८ ६७७.६०
खडकी ८६.८१ ७१५.५०

२४ गावांचे सरासरी दरडोई उत्पन्न २४८.७४ रुपये
महापालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या २४ गावांचे वार्षिक दरडोई उत्पन्न वेगवेगळे आहे. या सर्व गावांचे उत्पन्न आणि लोकसंख्या लक्षात घेतल्यास या सर्व गावांचे सरासरी वार्षिक दरडोई उत्पन्न २४८ रुपये ७४ पैसे आहे. यात ७५९ रुपये ९० पैसे सर्वाधिक दरडोई उत्पन्न हिंगणा गावाचे आहे. तर सर्वाधिक दरडोई कमी उत्पन्न हे खरप बु, उमरी प्रगणे अकोला आणि उमरखेड गावाचे आहे. ग्राम पंचायतीचे एकुण उत्पन्न लक्षात घेता वार्षिक दरडोई उत्पन्न हे २०४४.८३ झाले आहे.

महापालिका हद्दवाढीमुळे १५ ग्रामपंचायत सदस्यांचे पद रद्दबालद झाल्याने आता अनेकांनी मनपा निवडणुकीत उडी घेण्यासाठी तयारी सुरु केली आहे. आजपर्यंत गावातील छोट्या वार्डांमध्ये प्रत्येक घरातील, कुटुंबातील प्रत्येक सदस्याशी संपर्क असलेल्या या सदस्यांना शहरातील नागरिकांशी जुळवून घेताना दमछाक होत आहे. प्रभाग रचनेनंतर चित्र स्पष्ट हाेणार असले तरी अनेकांनी फिल्डींग लावून कामही सुरु केले आहे.

अनेक दिवसांपासून हद्दवाढीवर सुरु असलेल्या चर्चेला काही दिवसांपूर्वी पूर्णविराम लागला. काही गावांतील लाेकप्रतिनिधींनी सुरुवातीला हद्दवाढीला विराेध केला हाेता. काहींनी अांदाेलन केले. जिल्हा प्रशासनामार्फत निवेदनही देण्यात अाले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी काही लाेकप्रतिनिधींना सुनावणीसाठीही बाेलावले हाेते. दरम्यान, हद्दावाढीची अधिसूचना जारी झाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्यांचा जीव भांड्यात पडला. हद्दवाढीमुळे उमरी, शिवणी, गुडधी, खडकी, भाैरदसह २४गावे मनपा हद्दित समाविष्ट झाल्याने पंचायत समितीच्या चार सदस्यांचे पद संपुष्टात अाले.
शिवणी येथे सध्या तरी जिल्हा परिषद सर्कल भािरप-बमसंच्या ताब्यात अाहे. मात्र अाता हद्दवाढीनंतर प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर चित्र बदलणार अाहे. या परिसरावर सध्या काॅंग्रेसवासी अालेले मात्र कधी काळी भािरप-बमसंचा चेहरा असलेले जि.प.चे. माजी अध्यक्ष श्रावण इंगळे यांचे प्राबल्य अाहे. मनपा निवडणुकीत इंगळे यांचीही भूिमका महत्त्वाची राहणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...