आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागा वाटप युती-आघाडीमध्ये कळीचा मुद्दा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आता खलबते चालली आहेत. कॉग्रेस-राष्ट्रपवादी कॉग्रेसची आघाडी आणि भाजप-शिवसेनेची युती होणार का? याबाबत सर्वानाच उत्सुकता लागली आहे. मात्र हे चारही पक्ष स्वत:च्यात ताकदीत वाढ झाल्याचे मानत असल्याने जागा वाटपाचा मुद्दा युती-आघाडी होताना अडचणीचा ठरेल, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
२०१२ च्या निवडणुकीत भाजप-सेनेची युती आणि कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेसची आघाडी झाली होती. त्यावेळीही जागा वाटप कळीचा मुद्दा ठरला होता. ७३ जागांपैकी कॉग्रेसने ४६ जागा घेऊन राष्ट्रवादी कॉग्रेसला २७ जागा दिल्या होत्या. कॉग्रेसचे १८ नगरसेवक निवडून आले तर १७ जागांवर कॉग्रसेचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता.तर राष्ट्रवादी कॉग्रेसचे नगरसेवक निवडून आले आणि ११ जागी दुसऱ्या क्रमाकांवर होते. तर भाजपने ३६ जागा घेऊन शिवसेनेला २५ जागा दिल्या होत्या. युतीने १२ ठिकाणी उमेदवारच दिले नव्हते. भाजपचे १८ तसेच पाच बंडखोर निवडून आले तर चार जागी दुसऱ्या क्रमाकांवर होते. शिवसेनेचे आठ नगरसेवक निवडून आले तर सहा उमेदवार दुसऱ्या स्थानी होते.

या पाच वर्षाच्या कालावधीत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. कॉग्रेस रसातळाला गेली तर भाजपची ताकद प्रत्येक निवडणूकीत वाढत आहे. महापालिका निवडणुकी नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत ग्रामिण भागातही भाजप क्रमांक एकवर राहिला.

तर शिवसेना, कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेसचा एक आमदारही निवडून आला नाही. त्यामुळेच यापूर्वी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत युती करताना मोठ्या भावाची भूमिका शिवसेनेने उठवली होती ती भूमिका आता भाजपकडे केली आहे. त्यामुळे महापालिकेत २४ गावांचा उर्वरित.पान
ग्रामिण भागातही भाजपची मुसंडी
अडीचवर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना, कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेस आमने-सामने लढले. आता पर्यंत ग्रामिण भागात वर्चस्व नसलेल्या भाजपला इतर पक्षांपेक्षा अधिक मते मिळाली. विशेष म्हणजे अकोला पूर्व शिवसेनेचा गढ समजला जातो. त्या जागेवरही भाजपने कब्जा केला. जी २४ गावे महापालिकेत नव्याने समाविष्ट झाली आहेत. त्या सर्व गावात सरासरी क्रमांक एकवर भाजप, ुसऱ्या स्थानावर भारिप-बमसं तर तिसऱ्या स्थानावर शिवसेना आहे. त्यामुळे भाजप अधिक जागांवर दावा करण्याची शक्यता राजकीय िवश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
बातम्या आणखी आहेत...