आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका निवडणूक: आघाडीमधील बिघाडी, गटातटामुळे काँग्रेसच्या ‘हाता’ची पिछाडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला- काॅंग्रेस-राष्ट्रवादीकाँग्रेस अाघाडीत झालेली बिघाडी, िनयाेजनाचाअभाव, काही नेत्यांचा हेकेखोरपणा, पक्षांतर्गत गटातटाचे राजकारण, परिणामी महापालिका निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना स्वत:च्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागल्याने काँग्रेसची पिछाडी झाली, असे जाणकारांचे मत अाहे. सन २०१२मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे १८ नगरसेवक निवडून अाले हाेते. यंदाच्या झालेल्या निवडणुकीत ही संख्या अाली अाहे. 

महापालिकेच्या सन २००२, २००७ २०१२ मध्ये झालेल्या निवडणुका काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने अाघाडी करुनच लढल्या. सन २०१२मध्ये तर दाेन्ही काॅंग्रेसने पहिल्या अडीच वर्षासाठी सत्ताही स्थापन केली. त्यानंतर महानगराध्यक्षपदी माजी अामदार बबनराव चाैधरी यांची वर्णी लागल्यानंतर काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील नेते अाक्रमक झाले. त्यांनी या निवडी विरोधात अात्मक्लेश अांदाेलनाचा इशारा देत थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना लेखी निवेदन दिले हाेते. मात्र पक्षश्रेष्ठींनी निवडीच्या िनर्णयात फेरबदल केल्याने हे बंड फसले. 

दरम्यान, मनपा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर तर दाेन गटांमधील दरी वाढतच गेली. गटतटावरुन अनेकांना उमेदवारी नाकारण्यात अाल्याचा अाराेप झाला. अाता महापालिका निवडणुकीत काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला असला तरी पहिल्या दुसऱ्या क्रमांकामध्ये प्रचंड अंतर अाहे. भाजपला ८० पैकी ४८ तर काँग्रेसला केवळ १३ जागांवर समाधान मानावे लागले अाहे. ना नेत्यांचे झंजावात दाैरे झाले, ना उमेदवारांना पक्ष निधी मिळाला. एकूणच काँग्रेसला अच्छे दिन येण्यासाठी पक्ष बांधणीसाठी कठाेर निर्णय घ्यावे लागणार अाहे, असे जाणकारांचे म्हणणे अाहे. 
 
संधी‘हातून’ गेल्या 
लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुका काॅंग्रेस स्वबळावर लढली. मात्र या निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. काँग्रेसच्या उमेदवाराला अकाेला पूर्वमध्ये हजार ५४२ तर पश्चिम मतदारसंघात हजार १६४ मते मिळाली हाेती. पदवीधर मतदारसंघातही काँग्रेसला पराभव झाला. सातत्याने हाेत असलेल्या पराजयाचा परिणाम महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या कामगिरीवर झाला. 

मुलाखतीदरम्यानच झाली हाेती खडाजंगी 
मनपानिवडणुकीत इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान उमेदवारीवरून महानगराध्यक्ष बबनराव चाैधरी प्रदेश महासचिव मदन भरगड यांच्या वाद झाला हाेता. त्यानंतर जठारपेठ, राऊत वाडी, रामनगर, सिव्हील लाईन्स, आकाशवाणी केंद्र परिसरात िवराेधी पक्षाच्या उमेदवारांचा ‘विजय’ सुकर व्हावा, यादृष्टीने काॅंग्रेसने उमेदवारी िदल्याचा अाराेप पक्षातून झाला. काँग्रेसमधील ही दरी वाढल्याचे निकालावर नजर टाकल्यास दिसून येते. 

..तर संघर्ष तीव्र हाेणार 
महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे निवडून अालेल्या १३ पैकी नगरसेवक हे दुसऱ्या फळीच्या गटातील म्हणून अाेळखले जातात. त्यामुळे काँग्रेसमध्ये गटतटाची विचार केल्यास पक्षात दुसऱ्या फळीतील नेत्यांचे वजन वाढले अाहे. या निकालावरून पक्ष संघटनेत फेरबदल झाल्यास दुसरी फळीतील नेते नेतृत्वासाठी अाक्रमकपणे पुढे येतील.अाता पक्षश्रेष्ठी काेणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले अाहे. 

दुसऱ्याफळीची अशीही रणनिती 
महापालिका निवडणुकीत काॅंग्रेसचे दाेन माजी महापाैर मदन भरगड अाणि सुरेश पाटील यांचा पराभव झाला. पाटील हे एकदा शिवसेनेतून फिरुन काॅंग्रेसमध्ये अाले. मदन भरगड हे तर प्रदेश महासचिव अाहेत. त्यांच्या प्रभागातून काँग्रेसच्या उषा िवरक यांनी एेनवेळी राकाॅंकडून निवडणूक लढवली. त्याही महानगराध्यक्ष निवडीच्या िवराेधात हाेत्या. त्यामुळे सहाजिकच त्यांच्या विजयासाठी दुसऱ्या फळीतील काही नेत्यांनी पुढाकार घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. या प्रभागातून तीन उमेदवार भाजपचे तर एक राकाॅंच्या िवरक या विजयी झाल्या. 

अर्थात हाही रणनीतीचा एक भाग असल्याचे समजते. त्यामुळे एकाच दगडात दाेन पक्षी मारण्यात दुसऱ्या गटाला यश अाले. याच प्रभागात काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण यांची सभा झाली हाेती. मात्र त्याचा फायदा काँग्रेसला झाला नाही. तसेच काँग्रेसचे नेते तथा विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांचा राेडशाे झालेल्या जवाहर नगर, उमरी भागातील उमेदवार पराभूत झाले. दुसऱ्या फळीतील नेत्यांनी जास्तीत जास्त उमेदवार अापल्याच फळीतील कसे निवडून येतील, या दृष्टीने प्रयत्न झाल्याचे समजते. एकंदरित काँग्रेसमध्ये नियोजनाचा अभाव असल्याचे दिसून येते.
 
अाऊट गाेईंग राेखण्यात अपयश 
मनपा निवडणुकीत हवेची दिशा लक्षात घेऊन काँग्रेसच्या सहा नगरसेवकांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेसच्या नगरसेविका तथा विधानसभा निवडणूक लढलेल्या उषा िवरक यांनीही उमेदवारीवरून राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला. काॅंग्रेसचे साेमनाथ अडगावकर नसरुद्दीन सुफी यांनी भारिप-बमसंकडून उमेदवारी घेतली. अकाेला पूर्वचे युवक काॅंग्रेसचे नेते साेमेश्वर िडगे यांच्या पत्नी सविता डिगे यांनाही भारिप-बमसंने उमेदवारी दिली हाेती. मात्र याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा भाजप- शिवसेनेलाच झाल्याचे जाणकारांचे म्हणणे अाहे. 

१३ पैकी ११ उमेदवार मुस्लिम 
निवडून अालेले काँग्रेसच्या १३ पैकी ११ नगरसेवक मुस्लिम असून, पक्षाने अापल्यापासून पारंपरिक मतदार तुटणार नाही, याची काळजी घेतल्याचे दिसून येते. मात्र या विजयात संबंधित उमेदवारांचा वैयक्तिक संपर्क, करिश्मा माेठा हाेता, असे जाणकारांचे म्हणणे अाहे. खैर माेहम्मद प्लाॅट, भगत वाडी, खदान, अाकाेट फैल, नायगाव , गंगानगर यासारख्या मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये विकासाची कामे का करण्यात येत नाहीत, असा अाराेप एमआयएमचे नेते सय्यद माेईन यांनी २३ जानेवारीला जुने शहरात झालेल्या सभेत केला हाेता. याच भागात काॅंग्रेसचा पारंपरिक मतदार माेठ्या संख्येने हाेता. मात्र मतांचे विभाजन जास्त प्रमाणात झाले नाही, हेच दिसून येते. 
बातम्या आणखी आहेत...